
अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.
यावल (सुरेश पाटील): प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी तहसीलदार यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला सक्तीचे करण्यात आला आहे ती अट तात्काळ कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशी मागणी अमळनेर येथील हुसैनी सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.
दि.8 रोजी अमळनेर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अमळनेर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी तहसीलदाराचा उत्पन्न दाखला सक्तीचा करण्यात आला आहे.तरी सदरील अट कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी तसेच स्वयंघोषित उत्पन्न दाखला लागू करावा कारण तहसीलदाराचा उत्पन्न दाखला काढण्यासाठी प्रत्येकाला शंभर रुपये एवढा खर्च येतो तसेच उत्पन्न दाखल्यासाठी फिराफिर करावी लागते,तरी उत्पन्न दाखल्याची अट तात्काळ रद्द करावी अशी मागणी हुसैनी सेना जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मोइज अली सैय्यद,अमळनेर तालुका अध्यक्ष समीर मुजावर,तालुका उपाध्यक्ष समीर मुजावर,आवास फाउंडेशन अध्यक्ष राजु भाई काज़ी,आवास फोन्डेशनचे अध्यक्ष अशपाक शेख,अशपाक पेन्टर, मुजम्मील शेख,मुदस्सीर अली, विक्रम भाऊ,सलीम शेख,यांनी अंमळनेर गट शिक्षण अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.