फोटोग्राफी क्षेत्रात कॅमेरा हे शास्त्र आहे: अरुणभाई गुजराथी

Featured जळगाव
Share This:

फोटोग्राफी क्षेत्रात कॅमेरा हे शास्त्र आहे: अरुणभाई गुजराथी

 

चोपडा ( तेज समाचार प्रतिनिधी): फोटोग्राफी क्षेत्रात कॅमेरा प्रगत होण्यापूर्वी लाकडी बॉक्समध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटो तयार होत होते. कालांतराने यात मोठे बदल झाले. म्हणून कॅमेरा तंत्रज्ञानशास्त्र झाले. ते मात्र शस्त्र होऊ नये असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी केले.आनंदराज पॅलेस येथे आयोजित जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त तारीख 19 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते पुढे म्हणाले की, आम्हाला चित्र काढले की त्याची फॅशन होते काही लोकांना फोटो काढण्याची फार हौस असते, आणि सर्वांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो असे गुजराथी यावेळी म्हणाले.चोपडा तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे संचालक भगवान उर्फ छोटू वारडे यांनी गुजराथी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.माजी आमदार कैलासबापू पाटील,गटनेते जीवनभाऊ चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकराव देशमुख,शिवसेना चोपडा शहर नेते आबा देशमुख,सूतगिरणी संचालक तुकाराम पाटील,शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट प्रल्हाद पाटील,पटेल फोटो स्टुडिओचे संचालक भाऊसाहेब पाटील, विरवाडे येथील भरत काशीनाथ पाटील,मिलींद सोनवणे,संदीप ओली,चंद्रकांत पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत आशिष पाटील,बापू महाजन,रईसभाई, अजहर तेली,सागर महाजन,मुजमिल भाई,रहिसशेख,अकीलभाई शेख,प्रशांत चांदे,भूषण कोळी, बापू महाजन,शेखजावेद व मान्यवर फोटोग्राफर यांनी केले. मिलिंद सोनवणे,कैलास बापू पाटील यांनी आपल्या भाषणात फोटोग्राफीचा गौरव केला. प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार रमेश जे.पाटील यांनी फोटोग्राफी दिनाचे महत्त्व विषद केले.कोरोना कालखंडात ग्रामीण भागातील फोटोग्राफर शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले, फोटोग्राफर बंधूंनी व्यवसाय करताना दक्ष व सजग राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी ज्येष्ठ फोटोग्राफर कविकुमार उर्फ बाळकृष्ण विसपुते,विजय मोहन पाटील,आझाद चौकातील जिया दादा,ऋषिकेश राजपूत,सुमित राजपूत,कुणाल राजपूत व दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सूत्रसंचलन रमेश जे.पाटील यांनी केले तर आभार छोटू वारडे यांनी मानले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *