यावल नगरपालिका बांधकाम विभागात मोठा भोंगळ कारभार-परवानगीच्या आधीच व्यवसाय आणि बांधकामे सर्रास सुरू

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपालिका बांधकाम विभागात मोठा भोंगळ कारभार.

परवानगीच्या आधीच व्यवसाय आणि बांधकामे सर्रास सुरू

जिल्हाधिकारी जळगाव मुख्याधिकारी यावल यांनी गेल्या तीस वर्षातील चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येणार.

यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषद हद्दीत गेल्या तीस वर्षात आधी आपला व्यवसाय सुरु मग नंतर परवानगी तसेच आधी बांधकाम मग नंतर परवानगी काही व्यापाऱ्यांनी दुकानांचे,इमारतीचे आणि घर बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराचे इमारतीचे बांधकाम परवानगी आज पावतो घेतलेली नाही तसेच नगरपालिकेला आर्थिक चुना लावण्याच्या दृष्टिकोणातून यावल शहरात मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी आता तर पत्रीशेडची निर्मिती करून सर्रासपणे आपले उद्योग सुरू करण्यात आले आहेत अतिक्रमित जागावर तर काही धूर्त,चाणाक्ष लोकांनी तर अतिक्रमित जागा सांभाळून त्या जागा मासिक भाड्याने देऊन दरमहा आर्थिक उत्पन्न सुरू केलेले आहे,बिनशेती प्रकरण करणाऱ्यांनी तर आपल्या सोयीनुसार मर्जीप्रमाणे नगर रचना विभाग जळगाव,जिल्हाधिकारी जळगाव आणि यावल नगरपरिषद यांच्या आदेशाची नियमांची पद्धतशीरपणे पायमल्ली करून प्लॉट विक्री व्यवसायातून आपली चांदी करून घेतली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्यासह यावल नगरपरिषदेतील बांधकाम विभाग शाखा अभियंता यांनी अनधिकृतपणे आणि परवानगी न घेता बांधकाम करणार्‍यांकडे जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याने यावल नगरपरिषद हद्दीत बांधकाम क्षेत्रात भोंगळ कारभार सुरू होता आणि आहे या सर्व भोंगळ कारभाराची जिल्हाधिकारी जळगाव,नगर रचना विभाग जळगाव,यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी यावल नगरपरिषद हद्दीतील गेल्या तीस वर्षातील संपूर्ण बांधकामांचा, आणि व्यवसायिक दुकानांची, बिनशेती झालेल्या प्रकरणांची सखोल कसून चौकशी केल्यास फार मोठा घोटाळा गैरप्रकार अनियमितपणा उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
यावल शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटारी नसताना अनेकांनी यावल नगरपालिकेच्या अटी-शर्ती खड्ड्यात घालून अनधिकृतपणे बेसमेंट तयार केलेले आहे नंतर ग्राउंड फ्लोअर,मग पहिला मजला,दुसरा मजला,तिसरा मजला बांधकाम आपापल्या सोयीनुसार मर्जीनुसार केलेले आहे याकडे यावल नगर परिषद बांधकाम विभागाने पद्धतशीरपणे दुर्लक्ष कोणाच्या दबावामुळे आणि आशिर्वादामुळे केले ईत्यादी अनेक प्रश्‍न गुलदस्त्यात दडपून आहेत याकडे काही लोकप्रतिनिधींनी सुद्धा मते मिळण्याच्या दृष्टिकोनातून चांगले संबंध जोपासुन आपला राजकीय हेतू साध्य करून दुर्लक्ष करून राजकीय गोरखधंदा केलेला आहे.
दि.14/5/2018 रोजी यावल शहरातील फालक नगर मधील अनिल मधुकर मोरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार यावल येथील फालक नगर येथील रहिवासी संदीप दिलीप महाजन यांना या कार्यालयाचे पत्र क्र.यानप/बा.वि.4034/2016दि.15/12/2016ने बांधकामाची परवानगी दिलेली आहे मात्र संदीप दिलीप महाजन यांना फर्टीलायझर किटकनाशके, बि-बियाणे विक्री करणेबाबत या कार्यालयाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही असे स्पष्ट लेखी उत्तर यावल नगरपालिकेने दि.4/9/ 2018रोजी दिलेले आहे.यानंतर संदीप दिलीप महाजन यांनी फर्टीलायझर किटकनाशके बि- बियाणे विक्रीसाठी यावल नगरपालिकेकडून केव्हा परवानगी घेतली आहे किंवा नाही हे यावल नगरपालिकेलाच माहिती.
याच प्रमाणे अनिल मधुकर मोरे राहणार फालकनगर यावल यांनी दि.2/4/2019रोजी यावल नगर परिषदेकडे दिलेल्या तक्रार अर्जानुसार दि.19/6/2019रोजी यावल नगरपरिषदेने अनिल मोरे यांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की सि.स.नं.3239 संभाजी अशोक येवले यांना यावल नगरपरिषदेने या कार्यालयाकडील जावक नंबर 847 दि.10/7/2017अन्वये नवीन इमारतीची बांधकाम परवानगी दिलेली असून त्यांची नक्कल तुम्हास यापूर्वीच देण्यात आलेली आहे संदर्भीय अर्जांवर आपण सदर घरास नगरपरिषदेने दिलेले कम्प्लिशन सर्टिफिकेटची नक्कल मागितलेली असून नगरपरिषदेने इमारत मालकास कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलेले नसल्याने अभिलेखावर उपलब्ध नाही त्यामुळे तुम्हाला त्याची नक्कल उपलब्ध करून देता येत नाही असे दिलेल्या पत्रात यावल नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी यांनी नमूद केले होते आणि आहे.सदर घरमालकाला घर बांधकामाचे कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्यात आले होते किंवा नाही घर मालकाने मंजूर प्लॅन,नकाशा,इस्टिमेट प्रमाणे घराचे इमारतीचे बांधकाम केलेले आहे किंवा नाही हे सुद्धा गुलदस्त्यात दडपून असून घर मालकाने एकूण किती मजले बांधकाम केलेले आहे हा यावल नगरपालिकेचा संशोधनाचा विषय आहे.
बिनशेती झालेल्या प्रकरणांमधील ओपन स्पेस मोकळ्या जागांचे वापर यावल नगरपालिकेच्या अटी-शर्ती नुसारच वापरले जात आहे किंवा नाही ओपन स्पेस जागांवर कोणी कोणी अतिक्रमण केलेले आहे?यावल नगरपरिषद हद्दीतील ओपन स्पेस खुल्या जागा ज्या काही संस्थांना दिल्या गेलेल्या आहेत त्यांनी यावल नगरपरिषदेचे सर्व अटी व शर्तीचे पालन केलेले आहे किंवा नाही याबाबत सुद्धा यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला तसेच यावल-चोपडा,यावल-फैजपूर,यावल- भुसावल रस्त्याच्या आजूबाजूस यावल नगरपरिषद बांधकाम विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्या अटी-शर्ती रोडसेंटर पासूनचे अंतर खड्ड्यात घालून बिनधास्तपणे अतिक्रमण करून खाजगी जागांच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून काहींनी पक्के आरसीसी बांधकाम करून तसेच अनेकांनी पत्री शेड उभारून आपले उद्योग धंदे सुरू केलेले आहेत याबाबत यावल नगरपरिषदेने कोणत्या अटी शर्तीनुसार यांना परवानगी दिलेली आहे किंवा नाही याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.रोडच्या आजूबाजूस सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्या व नगरपालिकेच्या सार्वजनिक शासकीय जागेवर अनेकांनी अतिक्रमण करून टपऱ्या व दुकाने उभारून ही दुकाने शासकीय जागा दरमहा मासिक भाड्याने भाडे तत्वाने देऊन आपली बेकायदेशीर अनधिकृत कमाई सुरू केली आहे पर्यायी यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने याकडे मात्र संबंधित विभागांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
यावल नगरपरिषद हद्दीतील अनेक अनधिकृत अतिक्रमित बांधकामाची तसेच बिनशेती प्रकरणातील अनधिकृत अतिक्रमण केलेल्या कामाची सार्वजनिक रस्त्यावर आणि नाल्यामध्ये शासकीय जागेवर खासगी रित्या बांधकाम रस्ते तयार करून आपले स्वतःचे वैयक्तिक आर्थिक हेतू साध्य करणाऱ्यांचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांचे माहिती पुरावे संकलन करण्याचे काम सुरू असून याबाबत रीतसर जनहित याचिका लवकरच दाखल होणार असल्याचे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *