
बुलडाणा: महिलेची भर रस्त्यात केली प्रसूती, आरोग्य सेविका आल्या धावून
बुलढाणा (तेज समाचार डेस्क):कोरोना विषाणूचे संकट, त्यापार्श्वभूमीवर लावण्यात आलेले लॉकडाऊन आणि अशा परिस्थिती प्रसववेदना सोसणारी माता या संकट काळात ड्युटीहून घरी परतणा-या आरोग्य सेविका मदतीला धावून आल्यात. रस्त्याच्या कडेला आटो थांबवून त्यांनी या महिलेची प्रसूती केली. सदर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. संकट काळात माणूसकी अधोरेखीत करणारी ही घटना आज, बुधवारी सकाळी 10 वाजता बुलडाणा जिल्ह्यातील राजूरा घाट वळण परिसरातील देवी मंदिराजवळ घडली.
यासंदर्भातील माहितीनुसार खामखेडवरुन बुलडाण्यासाठी प्रसूतीकरीता आणल्या जात असलेल्या 20 वर्षीय निकिता ज्ञानेश्वर गावंडे या महिलेला मध्येच वेदना असह्य होत असल्याने, तिच्यासोबत असणाऱ्या 2 महिलांची तारांबळ उडाली होती. नेमके याच वेळी एका ऑटोतून काही आरोग्य सेविका बुलडाण्यावरुन मलकापूरकडे ड्युटीसाठी चालल्या होत्या, पुढे गेल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मागे येवून त्या महिलेची प्रसूति रस्त्यात करवली.
रस्त्याच्या कड़ेला ऑटो रिक्षा उभा केला व रिक्षात होत्या ती गरोदर महिला व सहा आरोग्य सेविका… या आरोग्य सेवीकेकडे सैनिटाइजर, मास्क, व आरोग्य सेवेचा अनुभव होता याच अनुभवातून देवरूपी आरोग्य सेवीकानी सौ अंकिता ची प्रसूति केली सर्व आनंदित झाले व गोंडस बाळ जन्माला आले , नाळ कापन्यासाठी जवळ काही नव्हते मात्र त्या महिलेसोबत असलेल्या महिलेकडे अड़कित्ता होता त्याला सॅनिटाइजर ने निरजंतूक केले व बाळाची नाळ कापन्यात आली व महिला व बाळ सुखरूप होते शेवटी त्या महिलेला व गोंडस बाळाला बुलढाणा शहराकड़े ऑटो रिक्शातुन रवाना केले व या देवदूत आरोग्य सेविका आपल्या ड्यूटिवर मलकापुरकड़े रवाना झाल्या.
कोरोनाच्या काळात सर्व घरी आहेत अश्या गंभीर परिस्थितीत सुद्धा सौ अंकिता गावंडे यांच्या प्रसूतिला निसर्गानेच या सहा आरोग्य सेविका धाडल्या असाव्यात.आता जिल्ह्या प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत या सहा आरोग्य सेविकाना पुरस्कार देऊन सन्मान करावा अशी मागणी जिल्हावासी करीत आहे.या आरोग्य सेविका मद्धे ए.एन.एम कंत्राटी कर्मचारी असलेल्या सुनंदा काटे, वैशाली सावळे, शितल जाधव, किरण राठोड, पल्लवी कांबळे व जयश्री पवार यांचा समावेश आहे.