
यावल : दहिगांवात बोडअळी निर्मूलन जनजागृती कार्यक्रम
कृषि विभाग व राशि सीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सौ.लता सोनवणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
यावल ( सुरेश पाटील). तालुक्यातील दहिगाव येथे मा.आमदार लता सोनवणे यांच्या उपस्थितीत कृषि विभाग व राशी सीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने कपाशी पिकावरील बोडअळी निर्मूलन विषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.माजी आमदार चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते.
यावल तालुका कृषी कार्यालयात तर्फे कपाशी पिकावरील बोंड अळी निर्मूलन संदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची प्रस्तावना आर.एन.जाधव तालुका कृषि अधिकारी,यावल यांनी करून बोडअळी जीवनक्रमाविषयी माहिती व बांधावरचे नियोजन तसेच बहूपर्यायी पीक पद्धती विषयी सखोल माहिती दिली. तसेच राशी सीड्स कंपनीचे प्रतिनिधी चेतन शिंदे बोडअळी निर्मूलनाविषयी माहिती देऊन फेरोमन सापळेचे प्रात्यक्षिक दाखवून प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.नंतर बोडअळी चित्ररथला हिरवी झेंडी दाखवून पुढे सावखेडासीम चुंचाळे नायगांव क़िनगांव वढोदा येथे चित्ररथ मार्गस्थ.
सदरील कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी किनगाव खैरनार साहेब,मंडळ कृषि अधिकारी फैजपूर सिनारे साहेब, कृषि पर्वेक्षक एम.डी. पाटील, कृषि सहाय्यक बारी, चौधरी, शिंदे, बारेला, कृषि मित्र नितीन जैन व मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश कोळी यांनी केले तसेच सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कृषि पर्वेक्षक निकम साहेब यांनी केले.