बॉलिवुडमधील मोठ्या नायकांचा प्रियांकासोबत काम करण्यास नकार

Featured महाराष्ट्र
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क):  बॉलिवुडमध्ये नायिका म्हणून काम करण्यास सुरुवात करताना सगळ्या नायकांबरोबर काम करण्याची तयारी प्रियांका चोप्राने दर्शवली होती आणि कामही केले होते. केवळ अभिनयच नव्हे तर प्रियांकाला (priyanka chopra) गायनाचीही आवड होती.

बॉलिवुडमध्ये नायिका म्हणून काम करीत असली तरी तिची स्वप्ने फार मोठी होती. तिला हॉलिवुडमध्ये गायिका अभिनेत्री म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करायचे होते. यासाठी तिने प्रयत्नही सुरु केले. त्याचाच एक भाग म्हणून तिने निक जोनासबरोबर लग्नही केले. परंतु प्रियांकाच्या हॉलिवुडच्या स्वप्नामुळे आणि तेथे कार्यरत झाल्यामुळे तिचे बॉलिवुडमध्ये काम करणे कठिण झाले आहे. याचे कारण म्हणजे सर्व मोठ्या कलाकारांनी प्रियांकासोबत सिनेमे करण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच प्रियांकाकडे सध्या एकही हिंदी सिनेमा नाही. बॉलिवुडमधील सूत्रांनी एका मोठ्या निर्मात्याचा दाखला देऊन सांगितले, हा निर्माता प्रियांका चोप्राला घेऊन एका सिनेमाची योजना आखत होता. यासाठी त्याने नायक म्हणून अक्षयकुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगण यांना विचारले परंतु प्रियांका नायिका असेल तर हा सिनेमा करण्यात रुचि नसल्याचे या नायकांनी त्याला स्पष्टपणे सांगितले. प्रियांकासोबत नवा तरुण नायक घेण्याचा विचार या निर्मात्याने केला तेव्हा या तरुण नायकांनी प्रियांकाचे वय झाले असून तिच्यासोबत जोडी सूट होणार नाही असे सांगत सिनेमा करण्यास नकार दिला. त्यामुळे आता बॉलिवुडमध्ये प्रियांकाचे काम करणे कठिण होणार असल्याचे दिसत आहे.

निक जोनाससोबत लग्न करण्याच्या आधीपासूनच प्रियांकाने बॉलिवुडकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. सलमान आणि प्रियांकात सगळ्यात पहिल्यांदा दुरावा निर्माण होण्यास सुरुवात झाली ‘मैं और मिसेस खन्ना’ सिनेमापासून. प्रियांकाने या सिनेमात सलमानसोबत काम करण्यास नकार दिल्याने सलमानला राग आला होता. त्यानंतर सलमानच्या एका सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका नाकारण्यासही प्रियांकाने नकार दिला होता. त्यामुळे सलमानने त्याच्या डायरीतून प्रियांकाचे नाव काढून टाकले होते. प्रियांकाला ही गोष्ट कळताच तिने सलमानची भेट घेऊन त्याचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सलमानने त्याच्या ‘भारत’ सिनेमासाठी प्रियांकाला साईन केले. परंतु प्रियांका निक जोनासशी लग्न करण्याच्या तयारीला लागली आणि ऐन वेळेला ‘भारत’मध्ये काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सलमानला ऐन वेळी नवीन नायिका शोधावी लागली. कॅटरीना कैफने सलमानची अडचण लक्षात घेऊन सिनेमात काम करण्यास होकार दिला. मात्र तेव्हाच सलमानने प्रियांकासोबत पुढे कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला जेव्हा प्रियांकासोबत काम करण्याची ऑफर दिली तेव्हा त्याने लगेचच ती नाकारली. सध्या अक्षयकुमार अत्यंत टॉपला आहे आणि तो सिनेमाचे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करतो त्यामुळे त्याच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर असतात. पण त्यानेही प्रियांकासोबत काम करण्यास नकार दिला. अर्थात याचे कारण वेगळेच आहे. अक्षय आणि प्रियांकाची जोडी खूपच लोकप्रिय झाली होती आणि दोघांमध्ये इलू इलूही सुरु झाले होते. तेव्हा अक्षयच्या पत्नीने ट्विंकलने अक्षयला योग्य शब्दात समज दिल्यानंतर अक्षयने प्रियांकासोबत काम न करण्याचा निश्चय केला आणि आजही तो त्यावर कायम असल्याने त्याने प्रियांकासोबत सिनेमा नाकारला.

शाहरुख आणि प्रियांकामध्येही असेच चांगले संबंध निर्माण झाले होते. दोघांनी दोन वर्ष सतत सोबत काम केले. केवळ सिनेमाचे शूटिंगच नव्हे तर अॅवॉर्ड शोचे अँकरिंग आणि आयपीएलच्या मॅचही दोघांनी एकत्र बसून बघितल्या होत्या. शाहरुखची पत्नी गौरी खानला याची माहिती मिळाली तेव्हा गौरी खानने नाराजी व्यक्त केली. करण जोहरनेही शाहरुखला प्रियांकापासून लांब राहाण्याचा सल्ला दिला. याचे कारण अग्निपथ सिनेमाच्या वेळी प्रियांकाने करणला दिलेला त्रास हे होते. शाहरुखने गौरी आणि करणचे ऐकले आणि प्रियांकापासून लांब राहाण्याचा निर्णय घेतला. शाहरुख आजही आपल्या या निर्णयावर कायम आहे.

प्रियांका गेली दोन दशके बॉलिवुडमध्ये असली तरी तिने आमिर खानसोबत अजून काम केलेले नाही. त्यामुळे निर्मात्याला आमिर आणि प्रियांकाची जोडी जमवावे वाटले पण आमिरने थेटपणे प्रियांकासोबत काम करण्यास नकार दिला. प्रियांकाशी काम न करण्याचे कारण आमिरने अजूनपर्यंत जाहीर केलेले नाही. पण या दोघांमध्ये चांगले संबंध नाहीत हे मात्र नक्की. त्यामुळे आमिर कधीही प्रियांकासोबत काम करीत नाही. प्रियांकाचे आता वय झालेले असल्याने नवा तरुण नायकही तिच्यासोबत काम करण्यास तयार नाही. त्यामुळे प्रियांका स्वतः जर हिंदी सिनेमाची निर्मिती करणार असली तरी तिला नायकासाठी एकदमच नव्या ताज्या तरुणांकडेच लक्ष द्यावे लागणार असल्याचे दिसत आहे. एकूणच सध्या तरी बॉलिवुडमध्ये प्रियांका अनवाँटेड असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *