राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात 42 युवकांचे रक्तदान

Featured नंदुरबार
Share This:

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात 42 युवकांचे रक्तदान

नंदुरबार( वैभव करवंदकर ): कोरोनासारख्या महामारी संकटात गरजू रुग्णांंना रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 42 युवकांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

देशासह राज्यात मागील वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. तसेच यावर्षीही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव तीव्र असून राज्यासह नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णांसह मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोना महामारीसारख्या संकट काळात कोविड बाधित रुग्णांसह अन्य रुग्णांना ऑक्सिजन, रेमडीसीवर इंजेक्शन आणि रक्तसाठ्याची गरज भासत आहे. म्हणून कोरोना संकटात काळात सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतराव पाटील साहेब, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मा.महेबुबभाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष मा.रविकांतजी वर्पे आणि प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुरजभैय्या चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांच्या मार्गदर्शनानेे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज दि.21 एप्रिल 2021 रोजी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील रामदेवबाबा मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते श्रीराम नववीनिमित्त प्रभूरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लबचे जिल्हाध्यक्ष राजरत्न बिरारे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, राष्ट्रवादीचे नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, इंजि.बी.के.पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष महेंद्र कुवर, राजू पाटील, प्रकाश मगरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष वामन पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्की बिरारे आदी उपस्थित होते. या शिबिरात 42 युवकांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी जनकल्याण रक्तपेढीचे प्रकाश भोई, पुष्पा नायक, मनिष पवार, गोरख भिल, संजय सूर्यवंशी या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. शिबिराला प्रतिसाद देत रक्तदान केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी आभार मानले. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोेशल डिस्टसिंगचे पालन व मास्क लावून नियमांचे पालन करण्यात आले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *