यावल येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे रक्तदान शिबिर..!

Featured जळगाव
Share This:

यावल येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे रक्तदान शिबिर..!

यावल ( सुरेश पाटील): कोरोनामुळे राज्यभरात आरोग्य यंत्रणेवर भलामोठा ताण पडलेला आहे.राज्यातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा अतिशय कमी आहे. म्हणून इतर रुग्णांची रक्ताअभावी होणारी हेळसांड थांबावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांच्या व युवक प्रदेशाध्यक्ष मा.महेबूबभाई शेख,कार्याध्यक्ष मा.सूरज चव्हाण,कार्याध्यक्ष मा.रवीकांत वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील पक्षाचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ते यांना ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन करुन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात होते.
म्हणून आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जळगाव जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यावल येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मनिष दादा जैन ,जिल्हाअध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील,युवक जिल्हाकार्यध्यक्ष दिपक पाटील,माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे,तालुकाअध्यक्ष प्रा.मुकेश येवले,डॉ हेमंत येवले,अरुण लोखंडे,गणीदादा,करीम मण्यार,पवन पाटील,यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर घेण्यात आले……
रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी युवकचे शहराध्यक्ष हितेश गजरे,कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, तालुका समनव्यक किशोर माळी,वीरेंद्रसिंग राजपूत,पवन धोबी,भूषण खैरे,विद्यार्थी तालुकाअध्यक्ष राकेश सोनार,मंजूर खान,डॉ विवेक अडकमोल,राजू अडकमोल तसेच अनेक राष्ट्रवादी युवक चे कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही रक्तदान करत या मोहिमेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *