
नंदुरबार : भारतीय जनता पार्टी च्या वतीने सेवा सप्ताहातंर्गत रक्तदान शिबिर उपक्रम
नंदुरबार ( वैभव करवंदकर) भारतीय जनता पार्टी च्या वतीने सेवा सप्ताह सुरू असून या उपक्रमात शहादा तालुक्यातील मसावद येथे रक्तदान शिबिर पार पडले तसेच नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे वृक्षारोपण करण्यात आले शहरातील जिल्हा शासकीय इस्पितळात रुग्णांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले तसेच आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी मंगल भवन येथे युवा मोर्चा तर्फे पार पडलेल्या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या उद्या 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या निर्देशानुसार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात आज युवा युवा मोर्चा तर्फे मंगल भवन येथे झालेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी , आमदार डॉ विजय कुमार गावित, माजी आमदार शिरीषदादा चौधरी जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, संतोष वसईकर जिल्हाध्यक्ष अनुसूचित मोर्चा, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, जिल्हा सरचिटणीस निलेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस सचिन देवरे, जिल्हा सचिव मयुर चौधरी जिल्हा सचिव अश्विन सोनार, जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माळी, जिल्हा सचिव मनोज सोनवणे,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जय चौधरी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राजपूत किरण वाडीले जिल्हा सदस्य, महिला मोर्चा स्वप्ना अग्रवाल योगिता बडगुजर, कोषाध्यक्ष विनम्र शहा, चेतन माळी रोहित गांगुर्डे संजय साठे जिल्हाध्यक्ष भटके-विमुक्त,सुदाम चौधरी, पंकज पाठक, विक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नंदुरबार जिल्हा व शहर व तालुका कडून रक्तदान शिबिराचे संयोजन जिल्हा सचिव मयूर चौधरी, अश्विन सोनार यांनी केले करण्यात आले होते.