
काळ्या गव्हामुळे उजळल शेतकऱ्याचं नशिब
धार (तेज समाचार डेस्क). मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील सिरसौदा ह्या छोट्याशा गावात रहाणारा विनोद चौहान नावाचा तरूण शेतकरी सध्या लाखोत खेळत आहे. आपल्या शेतातल्या एका प्रयोगामुळं विनोद चांगलाच चर्चेत आलाय. आपल्या शेतात लावल्या जाणार्या गव्हाऐवजी यावर्षी काळा गहू लावण्याचा विनोदनं निर्णय घेतला. गव्हाची काढणी झाली अन विनोदच्या आनंदाला पाराच उरला नाही. विनोदच्या रानातला हा काळा गहू घेण्यासाठी चक्क १२ राज्यांतून प्रतिसाद मिळाला आहे.
– 14 एकरात पेरला काळा गहू
विनोदनं आपल्या रानातील १४ एकर क्षेत्रात काळा गहू लावण्याचा निर्णय घेतला. या पीकातून तब्बल २०० क्विंटल गव्हाचं भरघोस उत्पन्न त्याला मिळवता आलं. यानुसार दरवर्षी मिळत असलेल्या उत्पन्नापेक्षा त्याचा चौपट नफा झाला होता. सिरसौदा परिसरात विनोदच्या या आधुनिक प्रयोगाचं चांगलच कौतुक होतं आहे.
– आरोग्या साठी फारच उत्तम
काळा गहू हा आरोग्यासाठी फारच उत्तम समजला जातो. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर काळ्या गव्हाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. एवढंच नव्हे तर, या गव्हात शरिरासाठी आवश्यक लोहाचं प्रमाण सर्वाधिक असत. या कारणाने काळ्या गव्हाचा देशभरातून भरपूर मागणी असते.
– अनेक रोगांमध्ये गुणकारी गहू
विनोदच्या मते, १४ एकर क्षेत्रात काळा गहू लावताना २५ हजार रूपयांचा तोटा सहन करावा लागतो. मात्र यातून मिळत असलेल्या नफ्याचा विचार करता ही रिस्क महत्वाची ठरते. कॅन्सर, मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा वजन वाढलं असल्यास हा गहू अत्यंत गुणकारी ठरतो.
– 7-8 हजार रुपए क्विंटल ने विकला जातो हा गहू
किंमतीचा विचार करायचा झाल्यास बाजारात काळा गहू ७ ते ८ हजार क्विंटल दरात विकला जातो. तुलनेने साधा गव्हाला फक्त २ हजार मिळतात. जर कमी जागेत जास्त उत्पन्न घ्यायचा विचार असेल तर काळ्या गव्हाची पेरणी करणं उत्तम पर्याय ठरू शकतो. असं विनोद सांगतो.
– सामान्य गव्हासारखी चव
कृषी उपसंचालक जामले यांच्या मते, काळ्या गव्हाची पेरणी करण्याचा निर्णय याभागात काही शेतकरी घेतात. या गव्हाचा मधुमेहाचा त्रास असलेल्या रूग्णांना बराच फायदा झाल्याचं शेतकरी सांगतात. एवढंच नाही तर हा गहू पचनासाठी ही चांगला असतो. विशेष बाब म्हणजे या काळ्या गव्हाची चव अगदी नेहमीच्या गव्हासारखी असते.