
शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी
मुख्यमंत्री ठाकरे, शालेय, वैद्यकिय व उच्च तंत्रशिक्षण मंत्री यांचाकडे मागणी
शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): राज्य सरकारने शाळा चालु करण्याचा निर्णय जाहिर केला असुन पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मनात कोरोनाच्या साशंकता आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी मुख्यमंत्री व अन्य मंत्री यांचाकडे केली आहे. भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना (दि.२९ जुन) रोजी ईमेलने पाठवलेल्या निवेदनातुन मागणी केली आहे. निवेदनाची प्रत राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड, वैद्यकिय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख, उच्च तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सांमत यांना हि पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनात महाराष्ट्रातील शाळांना एप्रिल मे व जून महिन्यात उन्हाळ्याची सुट्टी व ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी मिळतो, पुढील शैक्षणिक वर्षात या सर्व सुट्टया रद्द करुन, आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उशिरा चालू करण्याचा निर्णय घेतला तर शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वेळ मिळेल, अभ्यासक्रम कमी न करता फक्त सुट्टीचा कालावधी कमी करून अभ्यासक्रम देखील पूर्ण करता येऊ शकतो व त्याद्वारे विद्यार्थ्यांचा कोरोनापासून बचाव देखील करता येवू शकतो तसेच सध्या ग्रामिण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे असे भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी म्हटले आहे. व राज्यात मुख्यमंत्री, मंत्री व आमदार यांना कोरोना लागण होऊ नये म्हणुन २२ जुन पासुन सुरु होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. जेथे मोठी माणसे सांगुनही फिजिकल डिस्टन्स पाळत नाहित. ती अपेक्षा लहान मुलांकडुन बाळगणे कितपत योग्य आहे? शाळा सुरु करुन लहान मुलांचे जीव धोक्यात घालणे योग्य नाही. तरी शासनाने सध्याचा परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी भाजपा शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.