
भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन
जयपूर (तेज समाचार डेस्क): देशात कोरोनाचा प्रादूर्भाव दिसून येतोय. अशाच परिस्थितीत भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. किरण माहेश्वरी या राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या ज्येष्ठ आमदार होत्या. रविवारी किरण यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. किरण यांना भाजपाच्या कोटा उत्तर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती. या कोटा महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान ऑक्टोबरमध्ये माहेश्वरी यांना कोरोनाची लागण झाली होती. हरियाणातील गुरुग्राम याठिकाणच्या मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रविवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.
