भा.वि.प.राज्य प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांचा जळगाव जिल्हा दौरा संपन्न

Featured जळगाव
Share This:

भा.वि.प.राज्य प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांचा जळगाव जिल्हा दौरा संपन्न

बेरोजगार रेल्वे प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगारासाठी चर्चा.

यावल ( सुरेश पाटील ): भारतातील रेल्वे प्रशिक्षणार्थी युवकांच्या विविध समस्यांवर चर्चा करून रेल्वेमध्ये प्रशिक्षण केलेल्या युवकांना पूर्वीसारखा पक्का रोजगार मिळावा यासाठी जळगाव जिल्ह्यातील ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटिस असोसिएशनचे सदस्यांसोबत भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश मंत्री स्वप्नील जी बेगडे यांनी जळगाव जिल्हा दौरा करतेवेळी विविध समस्यांवर चर्चा करून उपस्थितांना ठोस आश्वासन दिले.
दिनांक 24 जुलै 2020 शुक्रवार रोजी जळगाव येथील नवीपेठ मधील छात्र शक्ती कार्यालयात नियोजित दौऱ्यानुसार भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश मंत्री स्वप्नील जी बेगडे आले असता जळगाव जिल्ह्यातील ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटिस असोसिएशनच्यावतीने जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण भारतातील रेल्वे प्रशिक्षणार्थी युवकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
रेल्वे मध्ये प्रशिक्षण केलेल्या युवकांना पूर्वी सारखा पक्का रोजगार मिळावा यासाठी जिल्ह्यातील ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अपेन्ट्रीस असोशियन चे सदस्य अनिकेत सोरते, जयवंत माळी, किशोर नंनवरे, सचिन बारी, समर्थ चौधरी,विशाल सपकाळे,पराग मराठे यांनी महाराष्ट्र राज्याचे ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अपेन्ट्रीस असोशियन चे संयुक्त सचिव भरत परदेशी याच्या नेतृत्वात बेरोजगार रेल्वे प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार मिळावा यासाठी चर्चा केली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश मंत्री स्वप्निल जी बेगडे यांनी सदरील समस्या सोडवण्यासाठी अ.भा.वि.प पूर्णतः प्रयत्न करेल व रेल्वे प्रशिक्षनार्थी युवकांच्या समस्या भारत सरकार तसेच मा. रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांच्या पर्यंत सदरील रेल्वे प्रशिक्षणार्थ्यांच्या समस्या पोहचणार असे आश्वासन रेल्वे प्रशिक्षणार्थ्यांना दिले.

प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांचे ठोस आश्वासन.

बऱ्याच वर्षा पासून प्रलबिंत असलेल्या रेल्वे ऍक्ट अँप्रेंटीस प्रशिक्षणार्थी यांच्या मागणी व अडचणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या राष्ट्रीय पातळीवर समितीच्या सदस्य व मा रेल्वे मंत्री यांच्या शी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावु #रेल्वे ऍक्ट अँप्रेंटीस प्रशिक्षणार्थी यांच्या लढ्याला अभाविप प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी उपस्थितांना ठोस आश्वासन दिले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *