
धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भाजप तर्फे अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल
धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भाजप तर्फे अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षा तर्फे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दि. 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.
त्यापूर्वी श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस (गुरुद्वारा मागे) येथे अनेक मान्यवर तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात येऊन तिथे भाजपातर्फे अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी माजी मंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल म्हणाले, विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी अमरिशभाई पटेल यांना जाहीर करत आहोत. पक्षनिष्ठा व नैतिकता सांभाळून त्यांनी राजीनामा दिला होता. जनतेत जावून काम करणारे नेते म्हणून भाई हे लोकप्रिय आहेत. भाईंनी जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच काम केले आहे. पक्ष कोणताही असो ते सतत विकासासाठी काम करतात. 2 वर्षासाठी ही निवडणूक असून भाईंना बिनविरोध करायला हवे. राज्यसभा बिनविरोध होते तर भाईंसाठी ही विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी ही अपेक्षा. धुळे नंदुरबार दोन्ही जिल्ह्यात सर्व नेते यांच्यात स्नेहभाव आज देखील आहे.
डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, भाईंना सर्वजण ओळखतात. त्यांचे कार्य उज्ज्वल आहे. त्यांना सर्व पक्ष मानतात. त्यांना विजयासाठी शुभेच्छा देतो.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल म्हणाले, सार्वजनिक जीवनात सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. दोन्ही जिल्ह्यात विकासकामे करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे. एक परिवार म्हणून आपण काम करु या. माजी आमदार प्रल्हादराव पाटील यांच्या मुळे मी राजकीय जीवनाला प्रारंभ केला असून विकास केंद्रबिंदू मानूनच काम करतो.
तसेच धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, धुळे महापौर चंद्रकांत सोनार, आमदार राजेश पाडवी, मोतीलाल पाटील, सुरेश रामराम पाटील, दिपक पाटील, सुभाष देवरे, राजवर्धन कदमबांडे, भरत गावित, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, कामराज निकम, तुषार रंधे, मोहन सूर्यवंशी यांनी अनुक्रमे मनोगत व्यक्त करून भाईंना पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले..
यावेळी व्यासपीठावर उमेदवार अमरिशभाई पटेल यांच्यासह माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित, आमदार काशिराम पावरा, आमदार राजेश पाडवी, राजवर्धन कदमबांडे, मोतीलाल पाटील, दिपक पाटील, शिवाजीराव दहिते, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, कुसुम निकम, धरती देवरे, धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, कामराज निकम, अनुप अग्रवाल, सुभाष देवरे, बबनराव चौधरी, सुरेश पाटील, बापू खलाणे, भरत गावित, उपमहापौर कल्याणी अंपळकर, संजीवनी सिसोदे, सुनिल बैसाणे, डॉ शशिकांत वाणी, संभाजी पगारे , भिमसिंग राजपूत, प्रविण महाजन, वेडू सोनवणे, मनुदादा पाटील, देवेंद्र पाटील, रमेश खैरनार, प्रविण महाजन, किशोर माळी वाघाडी, हेमंत पाटील, शंकरराव खलाणे, प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, अरविंद जाधव, हिरामण गवळी, नरेंद्रसिंह सिसोदिया, अनिल वानखेडे, राहुल रंधे, जयश्री अहिरराव, डॉ माधुरी बाफना, भुपेशभाई पटेल, तपनभाई पटेल, बंटी मासुळे, भिकन वारुडे, सुधीर जाधव,लक्ष्मीकांत शाह, राजेंद्र देसले, आनंद माळी, राजगोपाल भंडारी, बबनलाल अग्रवाल, गोपाल भंडारी, धुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रभाकरराव चव्हाण यांनी केले.