
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुस-या टप्प्यातील वर्षपुर्ती निमित्ताने कुटुंब संपर्क अभियान नंदुरबार येथील भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुस-या टप्प्यातील वर्षपुर्ती निमित्ताने कुटुंब संपर्क अभियान नंदुरबार येथील भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी
नंदुरबार ( वैभव करवंदकर ):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुस-या टप्प्यातील वर्षपुर्ती निमित्ताने भाजपाच्यावतीने व्यापकस्वरूपात सोशल मिडियाच्याव्दारे जनजागृती अभियान राबवणार असून यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री किशोर काळकर, आमदार राजेश पाडवी यांच्यासह पदाधिका-यांनी झुमव्दारे व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये सहभाग नोंदवत कार्यकर्ते व पदाधिका-यांशी संवाद साधला. येत्या काळात व्हर्च्यव्हल सभा,बुथ निहाय व्हाटसअॅप ग्रुप तयार करणे, तसेच व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे जनसंपर्क अभियान राबविण्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहीचे तसेच ऐतिहासिक कामांचा संदर्भ देत त्या पत्रकांचे वाटप देखील करण्यात येणार आहे.नंदुरबार जिल्हयात मंडळ निहाय व विधानसभा क्षेत्र निहाय संयोजन समिती गठित करण्यात आली असून विधानसभा क्षेत्र निहाय संयोजक नागेश पाडवी, मंडळशा संयोजक डॉ शशिकांत वाणी, सहसंयोजक निलेश माळी आणि अभियान प्रमुख म्हणून विजय चौधरी, सहसंयोजक राजेंद्र गावित यांची निवड करण्यात आली. दरम्यान, 8 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता व्हर्च्यअल सभा व व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे पदाधिका-यांशी केंद्र व राज्यातील पदाधिकारी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी पालकमंत्री जयकुमार रावल, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच धुळयाचे खासदार सुभाष भामरे आदी मान्यवर व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधतील, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी दिली.