
भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन !
भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन !
मुंबई (तेज समाचार डेस्क): भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हरिभाऊ जावळे हे 67 वर्षांचे होते. हरिभाऊ जावळे यांची यावर्षीच्या जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी निवड झाली होती. गेल्या काही दिवसांपासून हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारासाठी त्यांना जळगाववरुन मुंबईला हलवलं होतं.
दरम्यान, हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.