सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरे करावेत- महेंद्र रेडके

Featured जळगाव
Share This:

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरे करावेत;महेंद्र रेडके

होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व दिग्विजयसिंह पारेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वन्यजिवांसाठी केली पाण्याची सोय.

यावल ( सुरेश पाटील) : होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व दिग्विजयसिंह दत्तात्रय पारेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वनगळी दत्तात्रय पारेकर व त्यांच्या मित्रांनी केक,फुगे आतिषबाजी अशा अनेक गोष्टीला फाटा देत पारेकरवस्ती येथील वनविभागात वन्यजीव व प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली. वाढदिवसाची आठवण आयुष्यभर लक्षात राहील अशा सामाजिक कार्याची नोंद केली आहे.
उन्हाळामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे त्यांची तहान भागवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर सदस्य महेंद्र रेडके,धनाजी पारेकर, उपसरपंच पांडुरंग पारेकर,विक्रीकर निरीक्षक नवनाथ पारेकर,दत्ता पारेकर,व्हाईस चेअरमन दिपक पाटील,ग्रा.प.सदस्य प्रवीण पारेकर, सुहास पारेकर,भाऊसाहेब पारेकर, गणेश गुटाळ,राज पारेकर, आदित्यराज पारेकर, श्लोक पारेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुका वनअधिकारी राहुल काळे व त्यांचे सहकारी वन कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *