
शिरसाड येथे जुळ्या भावंडांचा वाढदिवस,सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा
शिरसाड येथे जुळ्या भावंडांचा वाढदिवस,सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा
यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील शिरसाड येथील रहिवासी माजी उपसरपंच धनंजय पाटील सर व मुख्याध्यापिका संगीता पाटील मॅडम यांचे जुळे चिरंजीव ग्रामपंचायत सदस्य तथा यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस धनंजय पाटील व तेजल धनंजय पाटील या जुळ्या भावंडांचा वाढदिवस भारतीय राष्ट्रीय युवा परिषद व गावातील सर्व मित्र परिवारामार्फत वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यासोबत मास्क व sanitizer सुद्धा वाटप करण्यात आले.संध्याकाळी गावाजवळील आदिवासी पाड्यावर जाऊन फळ व खाऊ वाटप करून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.पाटील परिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो.मागील16वर्षापासून अविरत पायी मुक्ताई दिंडीला जेवण असो किंवा गोरगरीब जनतेचे काम असो नेहमीच पाटील परिवार पुढे असतो.या कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल बाविस्कर,जिल्हा उपाध्यक्ष दिव्या पाटील व अविनाश जावळे,जिल्हा सचिव आकाश पाटील,आकाश धनगर,शुभम पाटील, कोमल पाटील,जिल्हा कोषाध्यक्ष कुणाल कोल्हे,जिल्हा टीम सदस्य योगेश चौधरी,दर्पण खेवलकर,नयन कुमार पाटील,गायत्री धांडे,योगिता भंगाळे(उपसरपंच आमोदा),तसेच विविध तालुक्यातील आशिष बोरोले,जयमाला चौधरी,धीरज पाटील,शिवम पाटील,रितेश भारंबे, तुषार विसपुते,निलेश पाटील,मयूर चौधरी,किरण चौधरी यासोबत गावातील प्रतिष्ठित सुरेश सोनवणे, राजेंद्र पाटील,(मा.ग्राम.सदस्य), वासुदेव सोनवणे,गोलू चऱ्हाटे, प्रभाकर जाधव,विष्णु सोनवणे,आबा ठाकूर(मा.ग्राम.सदस्य),रवींद्र धनगर, राहुल भालेराव,दीपक खंबायात, किशोर इंगळे,पांडुरंग पाटील,सुरेश शिंदे,ज्ञानेश्वर सोनवणे,विशाल इंगळे, अरविंद खंबायत,आप्पा धनगर, नितीन कोळी,विष्णु आवटे,पंकज खंबायत यासोबत इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.