शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे स्वाभिमानी सप्ताहाचे आयोजन

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार (वैभव करवंदकर).  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचँद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2020 पर्यंत स्वाभिमानी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत माजी आमदार उदयसिंह पाडवी , अभियंता बी.के. पाडवी , नगरसेवक चंद्रकांत पाटील , ओबीसी संघटनेचे सचिव कमलेश चौधरी , मराठा क्रांती मोर्चाचे नितीन जगताप , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बबलू कदमबांडे उपस्थित होते.

 12 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी पक्षाची अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे ऑनलाइन पद्धतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमाचे महत्त्व म्हणजे महाराष्ट्रातील तालुका पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, खासदार , आमदार , ज्येष्ठ नेते आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते पवार साहेबां वरती प्रेम करणारे नागरिक यांनी मुंबईला न जाता कोरोना च्या पार्श्वभूमीवर डिजिटल ऑनलाइन प्रक्षेपण अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका पातळीवर पवार साहेबांना शुभेच्छा द्याव्या तसेच मुंबई येथून थेट प्रक्षेपण होणार आहे.

13 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2020 या सप्ताहादरम्यान स्वाभिमानी सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्यात प्रत्येक तालुका पातळीवर रक्तदान शिबिर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 3000 मेडिकल किट गरजूंना वाटप करण्यात येणार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *