मोहराळा येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
मोहराळा येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
यावल ( सुरेश पाटील ) : मोहराळे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे आरक्षणेचे जनक राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची 146 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात शाहू महाराज्यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना केलेली आर्थिक मदत,अशपृष्य निवारण, व वंचित घटकातील मुलांसाठी शैक्षणिक कार्य, वसतिगृह सुरु केली होती ,आणि अनु.जाती-जमाती, इतरमागास वर्गासाठी केलेले आरक्षण यासह शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक कार्यें जीवन परिपाठ आज वाचनालया तर्फे कार्यांचा उजाळा केला. या स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन देवा अडकमोल यांनी केले होते
२६ जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस अस्पृश्य समाजाने सणाप्रमाणे साजरा करावा, असा ठराव बाबासाहेबांच्या प्रेरणेने मार्च १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानात माणगाव परिषदेने केला होता.
व तसेच समाजातील लहान बालक यांना महापुरुषांनी ची शिकवण देखील या वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आलेत, तसेच उपस्थित, देवा अडकमोल, डोंगर अडकमोल, रत्नाकर अडकमोल, सुनील सोनवणे, विकास अडकमोल, अभिषेक, युवराज, सागर, गौरव, सचिन, संदीप, व लहान बालक आधी उपस्थित होते.