पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम शुरू

Featured जळगाव
Share This:

यावल  (सुरेश पाटील).  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुक्यात भारतीय जनता पार्टी तर्फे सोशल डिस्टन्स पाळत तसेच नाकातोंडावर मास्क लावून सेवा सप्ताहांर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वतोपरी प्रयत्न करीत असून नियोजनबद्ध कार्यक्रम पार पाडीत आहेत यामुळे सर्व स्तरातील नागरिकांमध्ये पक्षाविषयी आपुलकी आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताह निमित्त बैठक पार पडली या बैठकीस प्रमुख अजय भोळे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली होती बैठकीच्या सुरुवातीला सुरुवातीला मा.आमदार कै. हरिभाऊ जावळे, कै शकुंतला कोळंबे कोरपावली,कै गोकुळ महाराज,सरस्वतीबाई विष्णू नारखेडे फैजपूर, माजी जि.प.सदस्य कै. सूर्यभान अण्णा पाटील साकळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व सदर बैठकीचे कामकाज सुरू करण्यात आले या बैठकीच्या विषयांमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण शहरासह तालुक्यातील गांवागावांमध्ये फळ वाटप तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण तालुक्याच्या वतीने रक्तदान व प्लाज्मा शिबिर आयोजित करण्यात आले आहे तसेच गांवागावांमध्ये भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता यांच्या घरावरती कायमस्वरूपी पक्षाचा झेंडा लावण्यात येणार आहे तसेच महात्मा गांधी जयंती,कै. आमदार हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त गांवागावांमध्ये वृक्षारोपण बॅनर लावणे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे या सप्ताहाची जबाबदारी म.सा.का चेअरमन शरद महाजन,कृषिभूषण नारायण बापू चौधरी,तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,यावल शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे, भा.ज.युवा मोर्चा अध्यक्ष सागर कोळी,डॉ.कुंदन फेगडे, राकेश फेगडे,रितेश बारी गोपालसिंग राजपूत,अतुल पाटील,अनंता नेहते,परेश नाईक यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली असून ते यशस्वीरित्या आपापली जबाबदारी पार पाडीत आहेत सर्व प्रमुख पाहुण्यांनी या सर्व समित्या व कार्यक्रमास आपल्या वतीने योगदान दिले असून या कार्यक्रमाचे प्रत्येक गांवात स्वागत करण्यात येत असून प्रतिसाद मिळत आहे. सेवा सप्ताह मध्ये प्रामुख्याने यावल पंचायत समिती सभापती सौ.पल्लवीताई चौधरी,पंचायत समिती उपसभापती दिपक अण्णा पाटील,मसाका चेअरमन शरददादा महाजन,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्य ओबीसी सेल उपाध्यक्ष हर्षलभाऊ पाटील,बाजार समिती उपसभापती उमेश पाटील,जे.डी.सी.सी.बँक संचालक गणेशदादा नेहते, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरोजीतभाऊ चौधरी,जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस राकेश फेगडे.तालुका सरचिटणीस विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपूत,बाळू फेगड़े,जिल्हा परिषद सदस्या सौ. सविताताई भालेराव,नीता साठे,योगेश साळुंखे,ज्ञानेश्वर तायडे,खेमचंद कोळी,यशवंत तळेले,लहू पाटील,किशोर कुलकर्णी,व्यंकटेश बारी, किशोर पाटील,किरणदादा महाजन,सागर कोळी इत्यादी सर्व भाजपा प्रमुख शक्ती प्रमुख व आदी मान्यवर सेवा सप्ताह कार्यक्रमात सक्रिय आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *