चितोडा गांवाजवळ अपघातात 2 जण जबर जखमी

Featured धुळे नाशिक
Share This:

1 प्राध्यापक, 1 बांधकाम मिस्तरी
आज सकाळी 9 वाजेची घटना

यावल (तेज समाचार डेस्क) यावल फैजपूर रोडवर यावल पासून 3 किलोमीटर अंतरावर चितोडे गांवाजवळ दोन मोटरसायकल चालकांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने यात दोन जण जबर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच यावल पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. घटना आज दिनांक 13 रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली.
यावल फैजपूर रोडवर यावल पोलीस स्टेशन पासून 3 किलोमीटर अंतरावर चितोडे गांवाजवळ पिरोबा देवस्थानाजवळ उतारावर सुसाट वेगाने येणाऱ्या दोन्ही मोटरसायकलींची समोरासमोर धडक लागल्याने यावलकडून सांगवीकडे जाणारे प्राध्यापक धांडे आणि सावदा येथून यावलकडे मोटरसायकल वरून येणारा एक बांधकाम करणारा मिस्तरी या अपघातात गंभीर जखमी झाले मिस्तरीचा एक पाय फॅक्चर झाल्याने यावल पोलिसांनी त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर प्राध्यापक धांडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना चितोड़े ग्रामस्थांनी तातडीने भुसावळ येथे खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे सुद्धा समजले. घटनास्थळी दोन्ही मोटरसायकली प्रत्यक्ष बघितल्या असता जोरदार समोरासमोर टक्कर झाल्याने मोटरसायकलचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आल्याने अपघाताची भीषणता लक्षात येते. अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्गावर वाहन चालक आपली वाहने सुसाट वेगाने चालवित असल्याने चितोडे गांवाजवळ अट्रावल फाटा जवळ दोन्ही बाजूने गतिरोधक बसविण्याची कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत चितोडे ग्रामस्थांनी करायला पाहिजे असे सुद्धा बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *