
सुभाषनगर येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार डॉ तुषारभाऊ रंधे यांच्या शुभहस्ते संपन्न
सुभाषनगर येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार डॉ तुषारभाऊ रंधे यांच्या शुभहस्ते संपन्न
शिरपूर (तेज समाचार प्रथिनिधी): जिल्हा परिषद 3054 बिगर आदिवासी उप योजना अंतर्गत रस्ता बांधण्याचे भूमिपूजन नामदार डॉ तुषारभाऊ रंधे यांच्या शुभहस्ते तसेच कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार काशीरामदादा पावरा यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला . आज वाघाडी जिल्हा परिषद गटात सुभाष नगर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार डॉ तुषारभाऊ रंधे हे म्हणाले की वाघाडी गटामध्ये सुभाष नगर येथे वर्गखोली रस्ते वाघाडी गावामध्ये नवीन वर्ग खोल्या व त्या ठिकाणी वाडीला जाणारा रस्ता शेतकऱ्यांसाठी आमच्या बळीराजासाठीची सुविधा तसेच वाघाडी गटामध्ये शेतांना जोडणारे गावांना जोडणारे रस्ते हे आपण मोठ्या प्रमाणात मंजूर केले आहेत आदरणीय माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या विकासाची दिशा आम्ही पुढे चालवीत आहोत त्यांची संकल्पना आम्ही पुढे चालवीत आहोत येणाऱ्या पुढील काळात या वाघाडी गटात कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सोयी अपूर्ण पडणार नाहीत सर्व जनतेचे विकासाचे काम घरकुल आदिवासी,दलित वस्त्यांमध्ये रस्ते सामाजिक सभागृह इत्यादी मंजूर करण्याचे प्रयत्न आम्ही जिल्हा परिषद स्तरावर करीत आहोत. यावेळी जिप सदस्या सखुबाई पारधी सरपंच विजय पारधी उप सरपंच तसवीर जमादार ग्रापं सदस्य पंकज वाल्हे वैशाली कोळी रामप्रसाद दाभाडे संगिरा शेख जयबाई पारधी रमणबाई पारधी रेखाबाई पारधी चैत्राम पारधी ग्रामसेवक व्ही एस कोळी इसाक शेख आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.