Raksha Khadse

साडेतीन कोटी रुपयाच्या कामाचे खासदार रक्षाताई यांच्या हस्ते भूमिपूजन

Featured जळगाव
Share This:

साडेतीन कोटी रुपयाच्या कामाचे खासदार रक्षाताई यांच्या हस्ते भूमिपूजन

विकासासाठी सर्वपक्षीय सदस्यांची एक जूट ; खासदार रक्षाताई खडसे.

यावल ( सुरेश पाटील ) : यावल नगरपरिषदेच्या वतीने विस्तारित भागातील नवीन पाण्याच्या टाकीवरून विविध 22 कॉलन्या मधील भागात 23 किलोमीटर अंतराची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन दि.17 सोमवार रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास विरारनगर मधील गजानन महाराज मंदिर परिसरात रावेर विधानसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ.नौशाद तडवी, उपनगराध्यक्ष राकेश कोलते व गटनेता अतुल पाटील मुकेश येवले यांचेसह इतर नगरसेवक उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रमात यावल नगरपरिषदेचे अपक्ष उपनगराध्यक्ष राकेश कोलते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक मुकेश येवले व इतर पक्षाचे न.पा.सदस्य उपस्थित असल्याचे बघून रक्षाताई खडसे यांनी सर्वपक्षीय नगरसेवक विकासासाठी एकत्र येत असल्याने कौतुक केले.पर्यायी 3 ते 4 सदस्य वगळता सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन काम करण्याची कला माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांना जमली आहे असे हे उदाहरण दुर्मिळ असते असे सुद्धा खासदार रक्षाताई खडसे यांनी बोलून दाखविले.
गेल्या तीन वर्षापासून विस्तारित भागामध्ये एक कोटी 91 लक्ष रुपये खर्च करून 10 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून पूर्ण झाली होती व जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नवीन पाण्याची टाकी पर्यंत रायझिंग मेन पाईपलाईनचे कामदेखील पूर्ण झाले होते मात्र वितरण व्यवस्थेचे पाईपलाईनचे काम रखडले होते.
डिसेंबर 2019 मध्ये यावल नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी घेतलेल्या पहिल्या सभेत माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील तसेच विद्यमान नगराध्यक्षा सौ.नौशाद तडवी यांनी पाईपलाईनचे कामास मंजुरी घेऊन त्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मंजुरी घेऊन व माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवून घेतली होटी.त्या कामाचा शुभारंभ आज रोजी रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कामामुळे विस्तारित भागातील 22 कॉलन्या मधील भागात 23 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असून नागरिकांना नगरपरिषदेचे हक्काचे पाणी मिळणार असून त्यामुळे पाणीपट्टीच्या माध्यमातून नगरपरिषदेचे दरवर्षी 20 लाख रुपये उत्पन्न वाढणार आहे. तसेच नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.या कामासाठी गटनेता अतुल पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने काम मार्गी लागले असल्याने खासदार रक्षाताई खडसे यांनी त्यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांचे कौतुक केले.
याप्रसंगी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रा. मुकेश येवले, श्रीमती रुखमाबाई भालेराव, सौ.देवयानी महाजन,सौ. पौर्णिमा फलक, सौ. कल्पना वाणी, सौ. रेखाताई चौधरी, नगरसेवक समीर मोमिन, शेख असलम, न. पा. अभियंता योगेश मदने, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे, नितीन सुतार, यांचेसह न.पा.कर्मचारी व नागरिक सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *