
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न
नंदुरबार ( वैभव करवंदकर ): नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिलाईपाडा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले या आवाहनाला प्रतिसाद देत नवनिर्माण संस्था व प्राथमिक शाळा भिलाईपाडा जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन आज महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिलाईपाडा येथे संपन्न झाला. या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन गट विकास अधिकारी अशोक पटाईत , जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक , भिलाईपाडा गावाचे सरपंच मणिलाल गायकवाड , ग्रामपंचायत सदस्य संजय वळवी , रमेश सोनवणे , दिलीप वळवी तसेच नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी , मुख्याध्यापक संतोष नांद्रे , उपशिक्षिका वृषाली नांद्रे , अनसुताई वळवी , भदाणे सर,पंकज पाटील, शिवाजी पाटील, लिंलेश्वर खैरनार ,प्रशांत जगताप ,दिलीप पाटील , ज्ञानेश्वर पेंढारे, दिलीप पावरा आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी लहान चिमुकल्यांना माहिती देण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत खैरनार यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनिर्माण संस्था प्राथमिक शाळा भिलाईपाडा येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.