
शिरपुर : भाजीपाला वहातुकीचे नांवा खाली अवैध दारु वहातुकीवर पोलीसांची कारवाई
शिरपुर – शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे पथकास दिनांक 09/05/2020 रोजी रात्री उशीरा गुप्त बातमीदार कडुन अशी माहीती प्राप्त झाली की एक महेंद्र बोलोरो पिकअप हि फळे ,भाजीपाला भरण्याचे कॅरेटमध्ये लपवुन अवैध रित्या दारु साठा घेवुन जाणार आहे. अश्या माहीती वरुन सपोनि अभिषेक पाटील यांनी शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे एक पथक नियुक्त करुन महा मार्ग क्रमांक 03 वर महा मार्ग सुरक्षा पथकाचे चौकी जवळ नाकाबंदी लावण्यात आली होती.वरील गुप्त माहीती नुसार एक बोलोरो पिकअप क्रमांक MH-41-AU1567 हीची नाकाबंदी दरम्यान तपासणी करीत असतांना सदर पिकअप मधील भाजी पाल्याचे रिकाम्या प्लॉस्टीक कॅरेट खाली लपवलेले दारुचे खोके मिळुन आले.
सदर माल व वाहन पोलीस पथकाने जप्त केला असुन वाहन चालक व त्याचा साथीदार नामे 1) सुनिल प्रकाश मगर वय 28 रा. मालेगांव 2) सुधीर हिरामण पवार वय 21 रा. मालेगांव यांना खालील मुददेमाला सह ताब्यात घेतले आहे. 1) 1,12,320 रुपये किमतीची टेंगो पंच कंपनीची देशी दारु त्यात 45 खोक्यात प्रत्येकी 48 बाटल्या प्रमाणे एकुण 2160 दारु चे बाटल्या 2) 500.000/- एक महेंद्रा कंपनी ची पांढरे रंगाचर बोलोरो पिकअप क्रमांक MH-41-AU 1567 त्यात पिवळे व लाल रंगाचे भाजीपाला वहातुकीचे कॅरेट असा एकुण 6,12,320/- रु किमंतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो. धुळे मा. अपर पोलीस अधिक्षक सो. धुळे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो. शिरपुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली सपोनि अभिषेक पाटील,पोहेकॉ गवळी,पोना 531 जाधव, पोकॉ योगेश दाभाडे यांचे पथकाने केली असुन गुन्हयाचा पुढील तपास असई नियाज शेख हे करीत आहेत.