
शासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति
शासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति
यावल (सुरेश पाटील): शहरातील तहसिल कार्यालयात शासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन सह विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देत महाशिबीर संपन्न झाले. या शिबीरात महसुल,कृषी, ग्रामविकास आदींच्या योजनेत राखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना जिल्हा न्यायधिश सह मान्यवरांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले झाले.या शिबिरात दिवसभरात सुमारे 50हजाराहून अधिक नागरीकांनी उपस्थिती दिली होती तर या कार्यक्रमाच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजना व त्या करीता लागणारे कागदपत्रक सह बँकांशी निगडीत विविध उपक्रमांची नागरीकांना माहिती देण्यात आली विविध विभागाचे शिबीरात30केंद्र उभारण्यात आले होते.तर या शिबीरात216नागरीकांना कोविल्ड शिल्ड लसीकरण करण्यात आले.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव व यावल तालुका विधी सेवा समिती यांच्या कडून शुक्रवारी शहरात महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ११ वाजेला या शिबीराचे उद्दघाटन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव अध्यक्ष न्यायमुर्ती एस. डी.जगमलानी यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायधिश ए.ए.के.शेख, उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन,पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे,यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायधिश एम.एस. बनचरे,सह दिवानी न्यायधिश व्हि. एस.डामरे,जळगाव महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया,जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ.समाधान वाघ, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके,जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे,मणियार लॉ कॉलेजचे प्राचार्य बी.युवाकुमार रेड्डी,प्रांताधिकारी कैलास कडलग, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे,तहसिलदार महेश पवार, वकील संघ अध्यक्ष ऍड.धीरज चौधरी,निवासी नायब तहसिलदार आर.के.पवार,वैद्यकिय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला,आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, गटविकास अधिकारी भाटकर, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे,पोलिस निरिक्षक सुधीर पाटील,सहाय्यक पोलिस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर, उपनिरिक्षक जितेंद्र खैरणार,नगर पालिका आरोग्य निरिक्षक सत्यम पाटील,राजेंद्र गायकवाड,राधा पोतदार,ऍड.नितिन चौधरी,ऍड. राजेश गडे,ऍड.एन.पी.मोरे, समांतर विधी सहायक शशीकांत वारूळकर,अजय बडे,नंदकिशोर अग्रवाल,हेमंत फेगडे सह विविध विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन माईसाहेब अमृत पाटील व आसिफ पटेल यांनी केले शेवटी आभार न्यायालय अधिक्षक एस.बी.शुक्ल,सी.एम. झोपे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नायब तहसिलदार आर.डी.पाटील, न्यायालयाचे के.के.लोंढे,व्ही. आर.तायडे,एस.एम.तेली,आर. व्ही.आमोदकर,जी.एस.लाड,डी. ए.गावंडे,एच.जी.सूर्यवंशी,पी.डी. पाटील,एस.जे.ठाकुर,एम.डी. जोशी,एम.एस.सपकाळे,एस.बी. काठोके,आदींनी परिश्रम घेतले.