
सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची होऊ शकते फसवणूक
मुंबई (तेज समाचार डेस्क): सरकार आता कोणत्याही वेळी लसीकरण मोहीम सुरू करू शकत असताना दुसरीकडे कोरोना लसीच्या नावाखाली फसवणूक करण्याची प्रकरणे सुरू झाली आहेत.
कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याचे सांगून तुमची वैयक्तीक माहिती घेऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. इंटरपोलने काही दिवसांपूर्वी याबाबत इशारा दिला होता की काही संघटित गुन्हेगारी नेटवर्क कोविड लसीच्या नावाखाली फसवणूक करू शकतात.
COVID-19 च्या लस नोंदणीसाठी अनेकांना फेक कॉल्स येत आहेत. यामध्ये अशा संशयित व्यक्ती आपल्या आधार कार्ड, ई-मेल आयडी वगैरे गोष्टींची मागणी करतात. यानंतर आधार व्हेरिफिकेशन साठी लागणारा ओटीपी विचारतात. याचा गैरवापर करून संबंधित व्यक्ती आर्थिक व्यवहार करू शकते. अशा फोन कॉल बाबत सतर्क राहा.