बामणोद उपसा जलसिंचन पाणीवापर संस्था निवडणुकीची नोटीस संशयास्पद

Featured जळगाव
Share This:

 

सभासदाची तक्रार दाखल.

यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील बामणोद उपसा जल सिंचन पाणी वापर संस्थेच्या (यावल तालुक्यात बामणोद ,भालोद , हंबर्डी परिसर कार्यक्षेत्र असलेल्या) संचालक मंडळाचा निवडणुकीचा कालावधी संपल्याने संस्थेने दिनांक 10/9/2020 रोजी सार्वजनिकरीत्या काढलेली नोटीस प्रत्यक्ष बघितली असता नोटीसवर स्वाक्षरी करणाऱ्या संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांचे नांव, पद आणि संस्थेचा शिक्का नसल्याने दिलेल्या नोटीसचे मुदत व प्रसिद्धी बाबत संस्थेच्या 50% सभासदांमध्ये निवडणुकीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत एका सभासदाने पाटबंधारे विभागाचे यावल येथील उपविभागीय अभियंता यांच्याकडे तक्रार केली आहे.

बामणोद उपसा जलसिंचन पाणीवापर संस्था कडील जा.क्र1/2020-21दि.10/9/2020 रोजी काढलेली सार्वजनिक नोटीस बघितली असता नोटिशीत नमूद केले आहे की बामणोद उपसा जलसिंचन पाणीवापर संस्था मर्यादित बामणोद या संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणुकीचा कालावधी संपलेला आहे तरी संस्थेच्या दिनांक 8/9/2020 मंगळवार रोजी झालेल्या मासिक मिटिंग ठराव क्रमांक 4 नुसार उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग यावल यांचे दिनांक 12/8/2020 पत्रानुसार आपल्या संस्थेचे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होत असल्यास पाटबंधारे उपविभाग यावल यांना कळवावे असे पत्रात नमूद असल्याने ज्या सभासदांना संचालक मंडळ निवडणुकीत भाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी दिनांक 11/ 9/2020 ते दि.14/9/ 2020 या कालावधीत इच्छुकांनी आपले नांव संस्थेचे ऑफिस कार्यालयात सकाळी 8 ते 11या वेळेत द्यावे असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

नोटीस देणाऱ्या व्यवस्थापकाने किंवा पदाधिकाऱ्याने आपले नांव पद किंवा संस्थेच्या शिक्का स्वाक्षरी ठिकाणी मारलेला नसल्याने नोटीस बाबत पाणी वापर संस्थेच्या अनेक सभासदांमध्ये संशय वक्त करण्यात येत असून हरकत घेत असल्याची तक्रार संस्थेचे सभासद भागवत दयाराम फेगडे राहणार बामणोद यांनी उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग यावल यांच्याकडे दिनांक 23/9/ 2020 रोजी केली आहे या तक्रारीत म्हटले आहे की बामणोद पाणी वापर संस्थेची निवडणूक गावांमध्ये चार दिवस अगोदर नोटीस लावण्यात आली होती कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी जाहिरात नसताना निवडणूक कार्यक्रम न लावता बिनविरोध निवडणूक करण्यात येत आहे त्यावर माझी हरकत आहे तसेच निवडणूक प्रोग्राम कसा लावण्यात आला कोणत्या वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली याबाबतची तक्रार करण्यात आली आहे तरी पाटबंधारे विभाग यावल उपविभागीय अभियंता पुढील कार्यवाही काय करतात ? याकडे बामणोद उपसा जल सिंचन पाणी वापर संस्था सभासदांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *