
धुळ्यातील ‘या’ मशिदीतुन तब्बल ३६ जणांना घेतले ताब्यात, आझाद नगर पोलिसांची मोठी कारवाई
धुळे(तेज समाचार प्रतिनिधि ): शहरातील जुने धुळे परीसरातील आदर्श व्यायाम शाळा जवळील ख्वाजा मशिदीतुन तब्बल ३६ नागरीकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर नागरीक मोठ्या संख्येने प्रार्थना स्थळी दाखल झाल्याची माहीती आझाद नगर पोलिसांना मिळाली. या माहीतीच्या आधारावर पोलिसांनी ख्वाजा मशिदीत तपासणी असता तेथे पोलिसांना एकुन ३६ नागरिक दिसुन आले. सदर नागरीकांना आझाद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देशासह महाराष्ट्रात करोना या विषाणुने धुमाकुळ घातला आहे. दिवसेंदिवस मुंबई पुणे सारख्या विविध शहरामध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र व राज्यसरकारच्या वतीने महाराष्ट्र लॉकडाऊन करत संचारबंदी लागु करण्यात आली आहे. करोना संसर्गजन्य विषाणु असल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्याने त्याची लागण लागण्याची शक्यता असते. याकरीता नागरिकांनी एकाच ठिकाणी जास्तीच्या संख्येने गोळा होऊ नये यासाठी धार्मिक प्रार्थनास्थळे बंद करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारने दिले होते. मात्र या आदेशाला हरताळ फासत आज जुने धुळे परीसरातील आदर्श व्यायाम शाळा जवळील ख्वाजा मशिदीतुन तब्बल नागरीकांना आझाद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तसेच ताब्यात घेण्यात आलेले नागरीक कोणत्या परिसरातून आले व त्यांना याठिकाणी येण्यासाठी त्यांना कोणी उस्फुर्त केले याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ही सदर कारवाई डीवायएसपी सचिन हिरे, आझाद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पीएसआय सय्यद, रोशन निकम, पोकॉ चेतन सोनवने, सागर सोनवणे, महेश मोरे, रमेश गुरव, अविनाश वाघ यांच्यासह रॅपीड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शासनाच्या आदेशाला केराची टोपी
करोनासारख्या प्राणघातक विषाणुना रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व धर्मातील धर्म गुरुंची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत कोणत्याही धार्मीक प्रार्थनास्थळी गर्दी होणार नाही यासाठी प्रत्येक धर्मगुरुंतर्फे निर्णय घेण्यात आला होता. मात्र तरी देखील असे प्रकार होत असल्याने शासनाच्या आदेशाला हरताळ फासल्याचे चित्र धुळे शहरात दिसुन येत आहे