
औरंगाबाद : मजुरांची परवानगीसाठी तोबा गर्दी
औरंगाबाद : मजुरांची परवानगीसाठी तोबा गर्दी
औरंगाबाद (तेज समाचार प्रतिनिधि ) : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना त्यांच्या गावी (राज्य आणि परराज्य) जाण्याची सरकारने परवानगी दिली आहे. स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन नागरिक गावी जाण्याची घाई करू लागले आहेत.
गेल्या दोन दिवसात २५० लोकांना परवानगी दिली असून सोमवारी परवानगीसाठी मोठा लोंढा पोलीस आयुक्तालयात आला. यामुळे एकच धावपळ झाली. ऑनलाइन अर्ज करण्याचे सांगितल्यानंतरही ही गर्दी होत असल्याने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वांना माईकद्वारे सूचना देऊन नियोजन करण्यात येत आहे.