औरंगाबाद : जिल्हा बँकेचे फिरते एटीएम

Featured महाराष्ट्र
Share This:

औरंगाबाद : जिल्हा बँकेचे फिरते एटीएम

औरंगाबाद (तेज समाचार प्रतिनिधि): कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने ग्रामीण भागात बँकेतून पैसे काढण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने फिरते एटीएम सुरू केले आहे. यामुळे ग्राहकांची मोठी सोय झाली आहे. याकरिता राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री, बँकेचे संचालक अब्दुल सत्तार यांचे मार्गदर्शन मिळाले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सर्वात जास्त खाते शेतकर्‍यांचे आहेत. शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड बँकेच्या वतीने देण्यात आलेले आहेत. या फिरत्या एटीएम सुविधेमुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना गावातच पैसे काढता येणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात पैसे काढण्यासाठी येवू न शकणार्‍या ग्राहकांना या सुविधेमुळे आधार मिळाला आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या बँक ग्राहकांनी, तसेच बँक कर्मचार्‍यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, करोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी योग्य काळजी घ्यावी, असे अवाहन अब्दुल समीर यांनी केले आहेत. फिरते एटीएम उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा राजश्री निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेनेचे तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, डॉ. संजय जामकर, सिल्लोड शाखेचे मॅनेजर सपकाळ यांची उपस्थिती होती.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *