
औरंगाबाद : महिला डॉक्टरची गळफास घेवून आत्महत्या
औरंगाबाद : महिला डॉक्टरची गळफास घेवून आत्महत्या
औरंगाबाद (तेज़ समाचार प्रतिनिधि ): लग्नाला अवघे 15 दिवस शिल्लक असताना औरंगाबाद येथील महिला डॉक्टरने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या आत्महत्येचा कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शादाब शिरीन मोहम्मद आरीफ (वय 28, रा.टाइम्स कॉलनी, कटकटगेट परिसर) असे आत्महत्या करणार्या महिला डॉक्टरचे नाव आहे. डॉ. शादाब शिरीन या शासकीय कर्करोग रूग्णालयात नोकरीला होत्या. येत्या 13 मार्च रोजी त्यांचे लग्न होणार असल्याने घरी आनंदाचे वातावरण होते. मंगळवारी सायंकाळी डॉ. शिरीन या आपल्या स्टडीरूममध्ये अभ्यास करण्यासाठी गेल्या होत्या. बराच वेळ झाला तरी त्या बाहेर न आल्याने कुटुंबियांनी स्टडीरूमचा दरवाजा ठोठावला. परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबियांनी स्टडीरूमचा दरवाजा तोडला असता, डॉ. शिरीन यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे कुटुंबियांना आढळून आले.
डॉ. शादाब शिरीन यांना फासावरून खाली उतरवून नातेवाईकांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून डॉ. शादाब शिरीन यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले.