
औरंगाबाद मनपाने हायकोर्टात नेले 9 ट्रक केबल वायर
औरंगाबाद (तेज समाचार डेस्क): औरंगाबाद महापालिकेने शहरातील विविध भागातून जप्त केलेले सुमारे 9 ट्रक भरून केबल वायर्स आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले.
मनपाने जप्त केलेले 200 किलोमीटर लांबीचे केबल वायर सादर करावे असे आदेश हायकोर्टाने गेल्या आठवड्यात महापालिकेला दिले होते. औरंगाबाद शहरातील विविध भागातील विजेच्या खांबावर लोंबकळत असलेल्या केबल वायर्स मुळे अपघाताचा धोका वाढला होता. या बाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली असता मनपाच्या वतीने 200 किलोमीटर लांबीचे केबल जप्त केल्याचे शपथपत्र सादर करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने बुधवाही हे वायर्स 9 ट्रक्सवर लादून हायकोर्टापुढे सादर केलेत.