
औरंगाबाद: नेत्रहिन व्यक्तीची हत्या- पेट्रोल टाकून चेहरा जाळला
औरंगाबाद: नेत्रहिन व्यक्तीची हत्या- पेट्रोल टाकून चेहरा जाळला
औरंगाबाद (तेज समाचार प्रतिनिधि ): एका नेत्रहिन व्यक्तीची लोखंडी गजाने मारहाण करून हत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात तिडी शिवारात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हत्येनंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार तिडी ते संवदगाव रस्त्यावर गट क्रमांक 24 मधील रघूनाथ डूकरे यांच्या शेतात ग्रामस्थांना20 फेब्रुवारी रोजी सकाळी एक मृतदेह आढळून आला. याबाबत पोलीस पाटील जयश्री डुकरे यांनी वैजापूर पोलीसांना दिली. माहीती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर , पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानीक गुन्हे शाखा , ठसेतज्ञ , श्वान पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी लोखंडी गज, एक नेत्रहिन व्यक्तीची काठी, काडी पेटी, पेट्रोलची बाटली पोलीसांना आढळून आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे करीत आहेत.