856 ब्रास असलेल्या अवैध वाळू साठयाचा लिलाव दि.18ऑगस्ट रोजी- अवैध वाळू साठ्याची अपसेट प्राईस 34 लाख रुपये.

Featured
Share This:

856 ब्रास असलेल्या अवैध वाळू साठयाचा लिलाव दि.18ऑगस्ट रोजी- अवैध वाळू साठ्याची अपसेट प्राईस 34 लाख रुपये.
( प्रति ब्रास4हजार76 रुपये वाळूचा दर)

यावल (सुरेश पाटील): यावल तालुक्यातील तापी नदी पासून काही अंतरावर असलेल्या कोळन्हावी(न्हावी प्र.अडावद) परिसरात एकूण 856.32ब्रास अवैध वाळूचा साठा आढळून आला होता त्यानुसार तो अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला होता या अवैध वाळू साठ्याची अपसेट प्राईस 34 लाख 90हजार 361रुपये आहे हा अवैध वाळू साठयाचा लिलाव बुधवार दि.18ऑगस्ट2021रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दिली आहे. दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की अवैध वाळू साठा लिलावाबाबत तमाम सर्व नागरीकांना कळविण्यात येते की,मौजे न्हावी प्र.अडावद ता.यावल जि.जळगांव येथील अवैधरित्या अंदाजे 856.32 ब्रास अवैध वाळू साठा आढळुन आलेला आहे सदर अवैद्य वाळु साठा जप्त करण्यात आला होता.
सदर वाळुसाठया बाबत मा.अपर जिल्हाधिकारी,जळगांव यांनी त्यांचेकडील पत्र क्र.गौणख/ई-कावि/2021/939 दि. 27/07/2021अन्वये प्रती ब्रास 4076 मात्र अपसेट प्राईस ठरवुन देण्यात आलेली आहे.856.32 ब्रास अवैध वाळु साठयाच्या अपसेट प्राइस नुसार वाळू साठयाची एकुण किंमत ही 3490361/-मात्र आहे. लिलावाच्या सर्वोच्च बोलीची
रक्कम व सदरील रकमेवरील 10% DMF निधी,0.1मुद्रांक शुल्क,2%TCS व इतर
अनुषंगिक रकमा शासन जमा करणे आवश्यक राहील.वरील अवैध 856.32 ब्रास वाळु साठयाचा लिलाव दि.18/08/2021बुधवार रोजी
उपविभागीय कार्यालय फैजपुर येथे होणार आहे.तरी इच्छुक नागरीकांनी लिलावात भाग
घेणेबाबत याद्वारे सुचित करण्यात येत आहे.असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *