यावल शहरात मुख्य रस्त्यावरील घरात चोरीचा प्रयत्न

Featured जळगाव
Share This:

यावल शहरात मुख्य रस्त्यावरील घरात चोरीचा प्रयत्न

रस्त्यावरील लाईट बंद असल्याचा विपरीत परिणाम

यावल (सुरेश पाटील) : यावल शहरात मेन रोडवर भर चौकातील लाईट बंद असल्याचे संधी साधून एकाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याने. व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दिनांक 17 शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास शहरात मेन रोडवर गवत बाजारा पासून काही अंतरावर शालिक जाधव हे आपल्या कुटुंबियासह रात्री घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याची आतून लावलेली कडी उघडण्याचा प्रयत्न करून घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला असता घरातील व्यक्तींना आवाज आल्याने तसेच त्यांनी तात्काळ जोर जोरात आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूचे रहिवाशी प्रशांत कासार, बंडू कुलकर्णी, अजय कुलकर्णी, किशोर कुलकर्णी इत्यादी नागरिक तात्काळ नागरिक जमले असता अज्ञात चोरट्यांनी तिथून पळ काढला. मुख्य रस्त्यावर चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून यावल शहरातील भुरट्या चोरांचे काही नेतृत्व करणारे तसेच अवैध धंदे करणाऱ्यांपैकी काही जण यावल पोलीस निरीक्षक यांच्यासह काही पोलिसां सोबत राहून चमकोगिरी करीत असल्याने त्यांच्याशी संबंधित अज्ञात चोरट्यात्यांची दादागिरी व हिंमत वाढत असल्याने पोलिसांनी त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. तसेच यावल नगरपरिषदेने संपूर्ण यावल शहरात ज्या ज्या ठिकाणी मरक्यूरी सीएफएल बल/ लावलेले आहेत त्यापैकी अनेक ठिकाणचे बल बंद असल्याने ते तात्काळ सुरु करण्यात यावे असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *