
भुसावळ: तलवार व चाॅपरने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
भुसावळ ( नीलेश वाणी ) :- शहरातील अयान कॉलनी व ग्रीन पार्क भागातील तरुण वयोवृद्ध महिलेची मयत ठेवण्यासाठी गेले असता तू येथे कशासाठी बसलेला आहे याचा राग आल्याच्या कारणावरून तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल दि.२५ मे रोजी सायंकाळी घडली होती.
तीन महिन्यांपूर्वी गोलू उर्फ शाकिर सैय्यदने अजीमोद्दीन रिसालोद्दीन यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता. याच पूर्ववैमन्यासातून ही घटना घडली असावी.इस्माईल मोहम्मद आलम,जुबेर अहमद दोघे अयान कॉलनीतील तर अजीमोद्दीन रिसालोद्दीन हा ग्रीन पार्क भागातील रहिवाशी आहे.हे तिघेही वयोवृद्ध महिलेच्या मयतीसाठी मुस्लिम कॉलनी भागात गेले असता पाण्याच्या टाकी खाली बसलेले असतांना निळ्या रंगाच्या चारचाकीत गोलू शाकिर सैय्यद (वय २५) व शाकीब भांजा (वय २३) हे दोघे आले व म्हणाले की येथे कशासाठी बसलेले आहे असे म्हणून शिवीगाळ करून घरांमधून तलवार व चॉपर आणून तिघांवर हल्ला केला.या घटनेमध्ये तिघेही जखमी झाले होते.
खेडी जवळील रुग्णालयात उपचार घेऊन बाजारपेठ पोलीस ठाण्यात दि.२६ रोजी मध्यरात्री प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. हल्ला करून फरार झालेले आरोपी शाकिर उर्फ गोलू राशीद सैय्यद(डवय २३) रा.३२ खोली व शाकीब उर्फ भांजा दाऊद शेख (वय १९) रा गौसिया नगर यांची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहीतीने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन दिल्यावरून आरोपींना भुसावळ शहरातील पाटील मळा भागातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड ,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,संदीप परदेशी,पोहेकाॅ.सुनील जोशी, अयाज सैय्यद,पोना.रमण सुरळकर,रवींद्र बिऱ्हाडे,तुषार पाटील,महेश चौधरी,उमाकांत पाटील,पोकाॅ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव,श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी यांनी केली.