
घरा बाहेर पडलेल्या इसमावर मधमाशांनी केला हल्ला, झाला मृत्यु
पुणे (तेज समाचार डेस्क). सध्या कोरोनाचे संक्रमण थांबविण्या साठी संचारबंदी केली गेली आहे. आवश्यकता नसतांना घरा बाहेर फिरण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे. तरी काही लोकं या संचारबंदीचे उल्लंघन करत मोकाटपणे बेकामी घरा बाहेर फिरतांना दिसत आहे. देहूरोड परिसरात मंगळवारी बेकामी घरा बाहेर निघालेल्या एका 40 वर्षीय इसमा बरोबर एक विचित्र घटना घडली. विचित्र म्हणजे कि त्याला कोरोनाची लागत तर झाली नाही, पण या इसमावर मधमाशांनी जबर हल्ला केला. मधमाशांच्या या हल्यात हा इसम गंभीर रित्या जख्मी होऊन मृत्युमुखी पावला आहे. ईराअण्णा शेट्टी (विकासनगर) असे मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ वाजता शेट्टी देहूरोड येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात ईराअण्णा शेट्टी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, उपचारादरम्यान अवघ्या दहा मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला. शेट्टी यांना हृदयविकाराचाही त्रास होता. तसेच साधारण दीड वर्षापूर्वीही त्यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते, पण उपचारानंतर ते ठीक पण झाले होते.