
शिरूड : पहाटे-पहाटे चोरट्यांनी एटीएम केले लंपास
शिरूड (तेज समाचार प्रतिनिधि): जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच धुळे तालुक्यातील शिरुड गावात पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या बेसमेंटला असलेले एटीएम रोकडसह लंपास केल्याची घटना घडल्याने गावात एकच खळबळ माजली. चोरट्यांनी एटीएम मशीन्स अंदाजे आठ ते बारह लाखांची रक्कम लंपास केल्याचे माहिती सूत्रांकडून कळते.
एटीएम लुटीची माहिती कळताच तालूका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे कैद झाले या आधारे पुढील तपास पोलिस करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना चोरट्यांनी मोठी सलामी दिली आहे या अगोदर शिरुड गावातून एटीएम अशा प्रकारे दोनदा चोरट्यांनी एटीएम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिसऱ्या वेळेस चोरटे यशस्वी झाले
शुक्रवारी मध्यरात्री दीड ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी हा सगळा प्रकार केल्याचे उघड झाले याअगोदर शिरगावात एकाच रात्रीत सहा ते सात घरे चोरट्यांनी फोडली होती तपासकामी अधिक मदतीसाठी तालुका पोलिसांनी फिंगरप्रिंट तज्ञ श्वानपथक यांची मदत घेतली परंतु श्वान गावातील वेशीजवळ घुटमळत राहिला.
चोरी बाबत तालुका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. या अगोदर धुळे शहरात रामवाडी जवळील एक एटीएम चोरट्यांनी साखळदंडाने ओरबडून खेचून रोकडसह लंपास केले होते. देवपुरातील पंचवटी चौकातील एटीएम मध्ये सुरक्षारक्षकाला ठार करुन तेथील रोकड चोरट्यांनी लंपास केली होती त्याचा हि अद्याप तपास लागलेला.