सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती तर्फे ऑनलाइन श्री गणेश अथर्वशीर्ष पठण

Featured जळगाव
Share This:

यावल  (सुरेश पाटील) गणेशोत्सव काळात 1 सहस्त्र पटीने पृथ्वीवर येणाऱ्या गणेशतत्वाचा लाभ करून घेण्यासाठी या काळात गणरायाची भावपूर्ण उपासना करणे आवश्यक आहे. गणेश उपासनेत श्री गणेश अथर्वशीर्ष आणि श्री गणेश नामजप याना विशेष स्थान आहे. यासाठीच सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांनी विशेष ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन गणेशोत्सव काळात केले आहे. श्री गणेश अथर्वशीर्ष पठण आणि नामसाधना असे या ऑनलाइन कार्यक्रमाचे नाव आहे.

प्रतिदिन सायंकाळी 6.30 ते 7 या वेळेत प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात अथर्वशीर्षाचे पठणासोबतच गणेशाचा नामजप ही असणार आहे तसेच प्रतिदिन गणेश उपासनेविषयी महत्वाची माहितीही गणेशभक्तांना मिळणार आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि भावपूर्ण गणेश उपासना करून गणरायाची कृपा संपादन करून घ्यावी, असे आवाहन समितीच्या वतीने प्रशांत जुवेकर यांनी केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *