
औरंगाबाद येथे अट्टल घरफोड्या अटकेत
औरंगाबाद (तेज समाचार डेस्क): औरंगाबाद पोलिसांनी एका अट्टल घरफोड्याला अटक केली आहे. हर्सूल कारागृहातून जामिनावर सुटका होताच दुसर्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली असून सूर्यकांत ऊर्फ सनी गोपीनाथ जाधव (रा. क्रांतीनगर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सूर्यकांत उर्फ सनी जाधव याच्या ताब्यातून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 3 तोळे वजनाचे मंगळसूत्र जप्त केले आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, सहाय्यक फौजदार शेख नजीर, जमादार चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, आनंद वाहुळ, रवींद्र खरात आदींच्या पथकाने ही कारवाई केली.