यावल येथे मा. कांशीराम साहेब यांची 15 वी पुण्यतिथी साजरी

Featured जळगाव
Share This:

यावल येथे मा. कांशीराम साहेब यांची 15 वी पुण्यतिथी साजरी

यावल (सुरेश पाटील): डी.एस.फोर तसेच बामसेफ व बी.एस.पी.चे संस्थापक मा. कांशीराम जी यांचा15 वा परिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला.यावल येथे बोरावल गेट परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी चौकात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मा. कांशीराम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमांस निळे निशाण संघटनेचे ता.अध्यक्ष विलास भास्कर तसेच रोजगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे,तसेच निळे निशाण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे तसेच संघटनेचे युवा ता. अध्यक्ष विशाल तायडे,तसेच शाखा अध्यक्ष अट्रावल भूषण संपकाळे,कैलास लोहार,ए.के. तायडे,विष्णू लोखंडे,राजू अडकमोल,भरत अडकमोल, विवेक तायडे,अविनाश भास्कर, अशोक मच्चीवाले,किशोर अडकमोल,सागर गजरे,राहुल गजरे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज सोनवणे यांनी केले तर उपस्थित मंडळींचे आभार विलास भास्कर यांनी मानले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *