
जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाला नावासाठी विश्वनाथ साळुंखे कडून पाच लाख निधीचे आश्वासन
जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाला नावासाठी विश्वनाथ साळुंखे कडून पाच लाख निधीचे आश्वासन…
उर्वरित कामासाठी जवळपास १५ लाखाचा निधीची आवश्यक ; दानदात्यांनी सरळ हाताने मदत करावी
चोपडा (तेज समाचार प्रतिनिधी ): येथील जेष्ठ नागरिक संघाचे भव्य सभागृह बांधण्यात येत आहे. यासाठी संघातर्फे निधीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहना नुसार सभागृहाचा नावासाठी विश्वनाथ साळुंखे (चोपडा), ह. मु.मबुई यांनी दि.३०/८/२१ ला प्रत्यक्षात जागेची आणि सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून विश्वनाथ साळुंखे यांनी पाच लाख रुपये निधीचे आश्वासन दिले
यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य हजर होते जेष्ठ नागरिक संघाकडून अजूनही उर्वरित कामासाठी निधीकरिता आवाहन करण्यात येत आहे त्यात भवनातील मुख्य हॉलला नामकरणासाठी पाच लाखाच्या वर देणगी स्विकारली जाईल, ५० हजाराच्या देणगीदारांचे नाव संगमरवरी दगडावर सुवर्णाक्षरात लिहिले जाईल, २५ हजाराच्या
देणगीदारांचे स्मृती छायाचित्रं हॉलमध्ये लावण्यात येईल, ११ हजार ५ हजार देणगीदारांचे फलक लावण्यात येतील आणि प्रत्येक आजीवन सदस्यतासाठी २००१ /- इमारती फंड मदतनिधी देने बंधनंकारक आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जेष्ठ नागरिक संघाला मदत करावी असे आवाहन संघाचे अध्यक्ष व्ही.एच.करोडपती, बांधकाम समितीचे अध्यक्ष ऍड. एस. डी. काबरे, उपाध्यक्ष रमणलाल गुजराथी, एम.डब्ल्यू. पाटील,सचिव प्रमोद डोंगरे आदींनी केले आहे.