
देवपूरातील डॉक्टर पॉझिटिव्ह आढळल्याने मनपा प्रशासनाने प्रभाग क्रमांक 3 मधील परिसर केला सील
देवपूरातील डॉक्टर पॉझिटिव्ह आढळल्याने मनपा प्रशासनाने प्रभाग क्रमांक 3 मधील परिसर केला सील
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): देवपूर परिसरातील प्रभाग क्रमांक तीन मधील मोहम्मदी नगर येथील डॉक्टरचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने सदर परिसर हा कंटेनमेंट 22 घोषित करण्यात आला असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे मनपा प्रशासन तर्फे सदर विभागात निर्जंतुक फवारणी करण्यात आली यावेळी नगरसेवक सय्यद बेग मिर्झा मलेरिया विभागाचे सर्व पथक यांनी या वेळेस सदर संपूर्ण परिसर फवारणी करण्यात आली यावेळी सहाय्यक आरोग्य विभाग अधिकारी लक्ष्मण पाटील नंदलाल खांडेकर भटू वाघ गजानन चौधरी आनंदा भिल दिपक शिरसाट दिलीप माळी देविदास पवार गोकुळ पिंपळसे पिंटू पाटील तसेच नर्स स्टॉप सुरेखा कांबळे प्रियंका वसावे दिपाली सोनवणे आदी सर्व मनपा प्रशासनाच्या या ठिकाणी सदर विभागात जाऊन फवारणी तसेच सर्व भागातील व्यक्तींच्या घरातील माहिती यावेळेस गोळा करण्यात आली असून सदर याबाबत मनपा आरोग्य विभागाचे कोरोना पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर कार्य चालू आहे