
सीमा सुरक्षा बल यांच्या निर्देशानुसार उत्कृष्ट कार्याबद्दल विरावली येथील महेंद्र पाटील यांना सेवा पदक व प्रमाणपत्र.
सीमा सुरक्षा बल यांच्या निर्देशानुसार उत्कृष्ट कार्याबद्दल विरावली येथील महेंद्र पाटील यांना सेवा पदक व प्रमाणपत्र.
यावल (सुरेश पाटील): नॉर्थ ईस्ट(मेघालय आणि त्रिपुरा)येथे जवळपास4वर्ष शांतता व सामान्य वातावरण राखण्याच्या दृष्टीने महानिदेशक,सीमा सुरक्षा बल(BSF) नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पूर्वोत्तरच्या अतीदुर्गम भाग असलेल्या मेघालय आणि त्रिपुरा येथे केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार सेवेच्या परिचालन उत्कृष्टतेवर आधारित उत्कृष्ठ सेवेकरिता यावल तालुक्यातील विरावली येथील राहिवासी सध्या बीएसएफ मधे सहा. उपनिरीक्षक(अनुसचिवीय) पदावर तैनात महेन्द्र पुंडलिक पाटील यांचा राम अवतार,संयुक्त निदेशक/महानिरीक्षक,सीमा सुरक्षा बल टेकनपूर,ग्वालियर यांचे हस्ते कोविड 19 चे पालना करत एक छोटे खानी कार्यक्रमातपोलिस अंतरीक सेवा पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या सम्मानाने विरावली गावातिल नागरिक व यावल तालुक्या करिता ही गौरवास्पद व आंनदाची बातमी आहे. या सम्मान सोहळाचे कार्यक्रम प्रसंगी के.एल.शाह, उपमहानिरीक्षक विक्रम कुंवर, कमांडेंट व अरुण कुमार गंगवार, द्वितीय कमांडिंग अधिकारी व अन्य अधिकारीगन उपस्थित होते. महेंद्र पाटील यांना बीएसएफ तर्फे सेवा पदक आणि प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.