चोपडा : ‘अर्हनिश सेवामहे’ कोविड योद्धा सफाई कामगारांचा गौरव

Featured जळगाव
Share This:

मुख्याधिकारी गांगोडेंनी दिले प्रत्येकी हजार रुपये

चोपडा – येथील नगर परिषदेत मार्फत कोरोना व्हायरसचा प्रतिकार करण्यास जिवतोड परिश्रम घेणाऱ्या सफाई कामगारांना पालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी खुद्द प्रत्येकी एक हजार रूपये बक्षीस व गौरवपत्र बहाल केले.पालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे ९५ स्वच्छता कामगारांना याचा लाभ दिल्याचे मुख्याधिकारी गांगोडे यांनी कळविले आहे.
या निमित्ताने मुख्याधिकारी गांगोडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,’अर्हनिश सेवामहे’ या उक्ती प्रमाणे कोविड १९ व्हायरसशी लढा देतांना सफाई कामगारांनी महत्वपूर्ण भुमिका निभावली आहे.आपल्या जिवाची पर्वा न करता शहराची साफसफाई करुन निगा तर ठेवलीच सोबत कोराना योद्धा म्हणून अभूतपूर्व काम केले आहे.
तसेच शहराचे वारंवार निर्जंतूकीकरण करण्यासाठी मदत केली.कोविड विलगीकरण केंद्रावर साफसफाई ठेवली.त्याचप्रमाणे कोरोनाने ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या अंत्यसंस्कार करण्याची मोठी जबाबदारी देखील पार पाडली आहे.कोरोनाच्या महामारीत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान मिळाल्याने त्यांचा सन्मान करणे उचित वाटल्याने पालिकेने त्यांचा सत्कार करुन या कामात त्यांना प्रेरणा मिळवावी म्हणून सत्कार केल्याचे मुख्याधिकारी गांगोडे यांनी सांगितले.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *