पुरातत्व विभागाने विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात केवळ नोटिसा न देता सर्व अतिक्रमण समय मर्यादेत हटवावीत

Featured जळगाव
Share This:

पुरातत्व विभागाने विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात केवळ नोटिसा न देता सर्व अतिक्रमण समय मर्यादेत हटवावीत.

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती प्रवक्ते:सुनील घनवट यांचे प्रसिद्धीपत्रक.

यावल (सुरेश पाटील): विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व खात्याचे,विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहणे यांनी भेट देऊन12लोकांना नोटिसा दिल्या आहेत,गेली17वर्षे कोणतीच कृती न करणाऱ्या पुरातत्व विभागाने किमान अतिक्रमणाच्या संदर्भात पाहणी करून नोटिसा दिल्या ही एक समाधानाची गोष्ट आहे; मात्र विशाळ गडावर वर्ष1998पासून मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण पहाता गडावर एकूण 64 मोठी आणि नव्याने बांधकाम झालेली 45 हून लहान/छोटी मोठी अतिक्रमण झालेली आहेत त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे,गेली अनेक वर्ष पुरातत्व खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने हा ऐतिहासिक विशाळगड आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहे आणि तेथील मंदिरे नरवीरांच्या समाध्या दुर्लक्षित आहेत,त्यामुळे पुरातत्व विभागाने केवळ नोटिसा देण्यावर समाधान न मानता ठोस निर्णय घेऊन कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व अतिक्रमणे हटविण्यात यावी अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
सुनील घनवट यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, माहितीच्या अधिकारात यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार या विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बांधकामे झालेली आहेत असे पुरातत्त्व खात्याने मान्य केले आहे विशाळगड हा वर्ष1998 पासून पुरातत्त्व खात्याकडे असून यातील काही जमीन जरी वनविभागाकडे असली तरी या गडावर होणाऱ्या कोणत्याही आणि झालेल्या अतिक्रमणात पुरातत्व विभागाचे अंतिमत: जबाबदार आहे. या गडावर मुख्यत्वेकरुन रेहानबाबाच्या दर्ग्यासह जी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहे ती काढून टाकण्यासाठी पुरातत्व विभाग काय कारवाई करणार आहे?हे सुद्धा पुरातत्व विभागाने स्पष्ट करणे आवश्यक आहे.यातील काही अतिक्रमणे जरी वन विभागाच्या अंतर्गत येत असतील तरी या दोन्ही विभागांनी समन्वय साधून ऐतिहासिक गडावरील सर्व अतिक्रमण काढून टाकण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणे आवश्यक आहे,यापूर्वी गेल्या17वर्षांत पुरातत्व विभागाने अतिक्रमणधारकांना केवळ नोटिसा देण्याचाआणि कर्तव्यदक्षतेचा देखावा दाखवून काहीही केले नाही. त्यामुळे आता सुद्धा केवळ नोटीस देण्यापुरते मर्यादित न राहता ही संपूर्ण अतिक्रमणे हटविण्यात पर्यंत त्यांचा सर्व स्तरावरून पाठपुरावा घेणे आवश्यक आहे.याचबरोबर विशाळगडाची ग्रामदेवता असणाऱ्या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिराची दुरुस्ती आणि आमदार करण्यात यावा तसेच स्मारके समाध्या गटाची आणि तटबंदीची डागडुजी करण्यात यावी अशी मागणीही यानिमित्ताने विशाळगड संरक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती प्रवक्ते सुनील धनवट यांनी केली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *