
यावल शहरात पेट्रोल पंपासमोर देशी-विदेशी विक्रेत्याची मनमानी
यावल शहरात पेट्रोल पंपासमोर देशी-विदेशी विक्रेत्याची मनमानी
कोरोना नियमांची ऐसी की तैसी
दुकानाच्या बाहेर बसून पिण्याची व्यवस्था.
यावल ( सुरेश पाटील): यावल येथे यावल चोपडा रोडवर पोलीस स्टेशन पासून काही अंतरावरच असलेल्या पेट्रोल पंपासमोर देशी विदेशी दारू विक्रेता दुकानदाराकडून कोरोना नियमांची ऐसी की तैसी होत असून रोडला लागून दुकानाच्या समोर टेबल-खुर्ची टाकून देशी-विदेशी दारू पिण्याची व्यवस्था केलेली असल्याने याकडे दारू उत्पादन शुल्क विभागाचे व संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
यावल शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना काळात देशी विदेशी दारू दुकानात मद्यपींना दारू पिण्याची सत्ता मनाई आहे तरीसुद्धा दुकानदाराने अनधिकृतपणे आपल्या दुकानाच्या समोरच रस्त्याला लागून एक टेबल खुर्ची टाकून मद्यपींना दारू पिण्याची खुलेआम व्यवस्था करून दिली असल्याने तसेच याकडे संबंधित अधिकारीवर्ग व दारू उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे तसेच यावल तालुक्यात अनेक ठिकाणी देशी-विदेशी दारूचा अवैध व अनधिकृतपणे पुरवठा करून अवैध देशी विदेशी दारू वाजवीपेक्षा जास्त भावाने विक्री होत असल्याने यात मद्यपींची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक सुद्धा होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.