साकळी दहिगांव गटात शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्या जिल्हा नियोजन समिती निधीतून नवीन डी.पी.मंजूर

Featured जळगाव
Share This:

साकळी दहिगांव गटात शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्या जिल्हा नियोजन समिती निधीतून नवीन डी.पी.मंजूर

यावल ( सुरेश पाटील): तालुक्यातील थोरगव्हाण येथे ट्रान्सफॉर्मर(डीपी)चे उद्दघाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील व यावल पंचायत समितीचे उपसभापती दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपाचे कार्यकर्ते विनोद कृष्णा पाटील,बाळू पाटील,यादव चौधरी,बाळू शिंपी, प्रमोद सपकाळे, विनोद भालेराव,व योगेश भालेराव उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती सभेत नविन डी.पी.ची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत साकळी दहिगांव गटात नवीन ट्रान्सफॉर्मर(डीपी)मंजूर करण्यात आले आहेत.शेतकऱ्यांना शेतात पाणी पुरवठा व इतर कामे करण्यासाठी नेहमी विजेची कमतरता निर्माण होत होती संपूर्ण साकळी दहीगांव गटात नवीन डी.पी.बसवण्याचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसवली जाणार आहे. यामुळे आता शेतात काम करण्यासाठी लागणारी मुबलक विज शेतकऱ्यांना वापरता येणार असून शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे तीन ठिकाणी नवीन गुरांचा उपचारासाठी सुविधा उक्त केंद्र देखील उपलब्ध करण्यात आले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *